Marburg Virus : डोकेदुखी, ताप आणि डोळ्यांतून येतंय रक्त! १७ देशांमध्ये अलर्ट, 'या' व्हायरसमुळे १५ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 12:44 PM2024-12-03T12:44:48+5:302024-12-03T12:45:58+5:30

Marburg Virus : या व्हायरसचा धोका पाहता जवळपास १७ देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

What Is Bleeding Eye virus, Marburg virus That Has Killed 15 In Rwanda So Far, know about symptoms treatment vaccine | Marburg Virus : डोकेदुखी, ताप आणि डोळ्यांतून येतंय रक्त! १७ देशांमध्ये अलर्ट, 'या' व्हायरसमुळे १५ जणांचा मृत्यू 

Marburg Virus : डोकेदुखी, ताप आणि डोळ्यांतून येतंय रक्त! १७ देशांमध्ये अलर्ट, 'या' व्हायरसमुळे १५ जणांचा मृत्यू 

Marburg Virus :  एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातून रक्त येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण, हे त्या व्यक्तीसाठी घातक ठरू शकते. दरम्यान, सध्या आफ्रिकन देश रवांडामध्ये मारबर्ग व्हायरस पसरला आहे. याठिकाणी या व्हायरसने मोठा कहर केला आहे. आतापर्यंत शेकडो लोकांना याचा फटका बसला असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

या व्हायरसचा धोका पाहता जवळपास १७ देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मारबर्ग व्हायरसमुळे लोकांच्या डोळ्यांतून पाण्यासारखे रक्त बाहेर येते. यामुळेच याला ब्लीडिंग आय व्हायरस  (Bleeding Eye Virus) असेही म्हणतात. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) रिपोर्टनुसार, हा व्हायरस इबोला व्हायरस संबंधित आहे. त्यामुळे व्हायरल हेमोरेजिक तापही येतो. मारबर्ग व्हायरस लोकांच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतो आणि त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होतो. हा एक जुनोटिक व्हायरस आहे, म्हणजेच तो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. हा विशेषता वटवाघळांपासून उद्भवतो आणि वटवाघळांच्या रक्त, मूत्र किंवा लाळेच्या संपर्काद्वारे मानवांमध्ये पसरते. हा व्हायरस सर्वात आधी १९६१ मध्ये जर्मनीतील फ्रँकफर्टमध्ये आढळला होता.

या व्हायरसची लक्षणं काय आहेत?
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, मारबर्ग  व्हायरसची लक्षणे इबोला व्हायरससारखी आहेत.जेव्हा या  व्हायरसचा संसर्ग होतो तेव्हा लोकांना खूप ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, उलट्या, घसा खवखवणे, पुरळ उठणे आणि जुलाब यासारख्या समस्या होऊ शकतात. याशिवाय या त्रासामुळे अंतर्गत रक्तस्राव आणि अवयव निकामी होतात. या व्हायरसची लागण झाल्यावर अचानक वजन कमी होणे; नाक, डोळे, तोंड किंवा योनीतून रक्त येणे आणि मानसिक गोंधळ यांसारख्या समस्या उद्भवतात.

काय काळजी घ्यावी?
मारबर्ग व्हायरस संक्रमित लोकांच्या संपर्कातून पसरतो. डॉक्टरांच्या मते, शरीरातील द्रवपदार्थांद्वारे तो इतर लोकांमध्ये पसरतो. हे टाळण्यासाठी, संक्रमित लोकांपासून दूर रहा. सामाजिक अंतर ठेवा, मास्क वापरा आणि वारंवार हात धुवा.

Web Title: What Is Bleeding Eye virus, Marburg virus That Has Killed 15 In Rwanda So Far, know about symptoms treatment vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.