काय आहे Disease X? १४० हून अधिक लोकांचा मृत्यू, WHO कडून अलर्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 21:14 IST2024-12-09T21:13:46+5:302024-12-09T21:14:23+5:30
Disease X : या आजाराबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ७ महिन्यांपूर्वी अलर्ट जारी केला होता. आता त्याची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत.

काय आहे Disease X? १४० हून अधिक लोकांचा मृत्यू, WHO कडून अलर्ट!
गेल्या काही वर्षांपासून जगभरात काही ना काही नवीन आजार किंवा विषाणूचा धोका निर्माण होताना दिसून येत आहे. मंकीपॉक्स विषाणूची प्रकरणे अद्याप थांबली नव्हती, तोपर्यंत आफ्रिकेत मारबर्ग विषाणूचे आगमन झाले. त्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूनंतर आता आफ्रिकेत एक्स आजाराची (Disease X) प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. या आजाराबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ७ महिन्यांपूर्वी अलर्ट जारी केला होता. आता त्याची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत.
आफ्रिकेतील अनेक भागात यामुळे १४० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आजाराबद्दल किंवा रोगाबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे या आजाराला कोणतेही खास नाव दिले नाही. परंतु असे मानले जाते की, हे नवीन प्रकारच्या विषाणूमुळे होऊ शकते. २०१८ मध्ये प्रथमच एक्स रोगाचा उल्लेख करण्यात आला. पण तरीही हा आजार काय आहे, हे कळले नाही. काही भागात, लोकांना फ्लू सारखी लक्षणे दिसत होती आणि काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
एक्स आजार आल्यानंतरच जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला होता. कोरोनामुळे जगभरात अनेक लोकांना मृत्यू झाला होता. दरम्यान, एक्स आजाराचा संसर्ग कशामुळे होतो, याबाबत अद्याप पूर्णपणे माहिती समोर आली नाही. परंतु संसर्ग झाल्यानंतर अल्पावधीतच रुग्णांचा मृत्यू होत आहे. सतत वाढत जाणारी प्रकरणे आणि मृत्यू लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेने एक्स आजाराबाबत जागतिक अलर्ट जारी केला आहे.
हा आजार लहान मुलांसाठी धोकादायक!
आतापर्यंत, मध्य आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये एक्स आजाराची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत. आफ्रिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत नोंदलेल्या 386 प्रकरणांपैकी सुमारे 200 प्रकरणे पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची आहेत. हा आजार कसा पसरतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु असे मानले जाते की त्याचे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होते आणि श्वासाद्वारे पसरते. सध्या जागतिक आरोग्य संघटनेने हा आजार रोखण्यासाठी आवश्यक औषधे आणि काही तज्ज्ञ आफ्रिकेत पाठवले आहेत, मात्र हा आजार वेगाने पसरण्याची भीती आहे.
काय आहेत लक्षणे?
ताप
डोकेदुखी
अंगदुखी
श्वसनाचा त्रास