तोंड नेहमी नेहमी कोरडं का पडतं? जाणून याची कारणं आणि लक्षणं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:02 IST2025-02-19T16:02:27+5:302025-02-19T16:02:58+5:30

What Is Dry Mouth : जर तुम्हाला सुद्धा नेहमीच तोंड कोरडं पडण्याची समस्या होत असेल तर यामागचं कारण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सोबतच यावरील उपाय सुद्धा माहीत असायला हवेत.

What is Dry mouth and its symptoms and causes | तोंड नेहमी नेहमी कोरडं का पडतं? जाणून याची कारणं आणि लक्षणं!

तोंड नेहमी नेहमी कोरडं का पडतं? जाणून याची कारणं आणि लक्षणं!

What Is Dry Mouth : ड्राय माउथ ही एक आरोग्यासंबंधी एक गंभीर समस्या आहे. याला जेरोस्टोमिया (Zerostomia) नावानंही ओळखलं जातं. ही एक अशी स्थिती आहे ज्यात तोंडातील लाळ कमी होते. ज्यामुळे तोंड नेहमी नेहमी कोरडं पडतं आणि चिकटपणाही जाणवतो. जर समस्या नेहमीच होत असेल तर यामुळे दाता, हिरड्या आणि आरोग्यावरही वाईट प्रभाव पडतो. जर तुम्हाला सुद्धा नेहमीच तोंड कोरडं पडण्याची समस्या होत असेल तर यामागचं कारण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सोबतच यावरील उपाय सुद्धा माहीत असायला हवेत.

ड्राय माउथची लक्षणं

ड्राय माउथची वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात. यात सगळ्यात सामान्य लक्षण म्हणजे तोंड कोरडं पडणे किंवा चिकटपणा जाणवतो. त्याशिवाय लाळ घट्ट होते. हे सुद्धा एक लक्षण आहे. तसेच तोंडातून सतत दुर्गंधी येत असेल तर हेही ड्राय माउथचं एक लक्षण असू शकतं. चावण्यात, बोलण्यात आणि गिळण्यात अडचण होत असेल तर तेही याचीच लक्षणं आहेत. काही इतर लक्षणांमध्ये घसा कोरडा पडणे, जिभेवर रेषा दिसणे, जीभ कोरडी पडणे यांचाही समावेश आहे. 

ड्राय माउथची कारणं

ड्राय माउथ म्हणजे तोंड नेहमी नेहमी कोरडं पडण्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. सगळ्यात सामान्य कारणांमध्ये औषधांचं सेवन करणे, वय वाढण्यासोबतच शरीरात लाळेच्या ग्रंथींची काम करण्याची क्षमता कमी किंवा कॅन्सरच्या उपचारादरम्यान रेडिएशन थेरपीच्या इफेक्टचाही समावेश आहे. जर तुम्ही तहानलेले असाल किंवा पाणी कमी पित असाल तर किंवा एखाद्या चिंतेत अशाल तर तेव्हाही ड्राय माउथसारखी स्थिती होऊ शकते.

ड्राय माउथमुळे काय होतं?

तोंड कोरडं पडलं की, अस्वस्थ जाणवतं. तसेच ही समस्येनं दात आणि हिरड्यांचं आरोग्यही प्रभावित होतं. लाळ बॅक्टेरियांना न्यूट्रिलाइज करण्यास आणि दातांवरील कीड रोखण्यास मदत करते. पण जेव्ह लाळ तयार होणं कमी होतं, तेव्हा दातांमध्ये अन्नाचे कण आणि बॅक्टेरिया जमा होण्याचा धोका असतो. ज्यामुळे दात किडतात आणि हिरड्यांचीही समस्या होते. सोबतच तोंड कोरडं पडल्यानं काही खाण्यात किंवा पिण्यातही अडचण होते. ज्यामुळे काही खाण्याचा आनंदही कमी होतो.

काय आहेत उपचार?

ड्राय माउथवर उपचार याच्या कारणांवर अवलंबून असतो. जजर ही समस्या एखाद्या औषधामुळे किंवा मेडिकल कंडिशनमुळे होत असेल तर डॉक्टर चेकअप करून योग्य ते उपचार करतील. काही सामान्य उपायांमध्ये भरपूर पाणी पिणे, लाळेची निर्मिती वाढवण्यासाठी काही गोळ्या किंवा स्प्रे चा वापर आणि तोंडात ओलावा रहावा म्हणून काही गोष्टींचं सेवन यांचा समावेश आहे. 

Web Title: What is Dry mouth and its symptoms and causes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.