काय आहे Heat Stroke आणि कुणाला असतो जास्त धोका? जाणून घ्या बचावाचे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 09:50 AM2024-05-22T09:50:26+5:302024-05-22T09:51:01+5:30

Heat Stroke : काही लोकांचा तर यामुळे मृत्यूही होतो. अशात हीट स्ट्रोकची कारणं, याचा कुणाला जास्त धोका आहे आणि यापासून बचावाचे उपाय माहीत असले पाहिजे.

What is heat stroke, causes, symptoms and prevantion | काय आहे Heat Stroke आणि कुणाला असतो जास्त धोका? जाणून घ्या बचावाचे उपाय!

काय आहे Heat Stroke आणि कुणाला असतो जास्त धोका? जाणून घ्या बचावाचे उपाय!

Heat Stroke : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. लोकांचं घराबाहेर निघणं अवघड झालं आहे. जरजसं उन्ह वाढत आहे उन्हामुळे होणारे आजारही डोकं वर काढत आहेत. त्यामुळे या आजारांपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जात आहेत. उन्हाळ्यात हीट स्ट्रोक (Heat Stroke) एक मोठी गंभीर समस्या आहे. काही लोकांचा तर यामुळे मृत्यूही होतो. अशात हीट स्ट्रोकची कारणं, याचा कुणाला जास्त धोका आहे आणि यापासून बचावाचे उपाय माहीत असले पाहिजे.

काय आहे हीट स्ट्रोक?

एक्सपर्ट सांगतात की, हीट स्ट्रोक फारच घातक अशी समस्या आहे. जी जास्तकरून जास्त गरमीमुळे होते. याच्यामुळे जीवही जाऊ शकतो. जेव्हा शरीराचं तापमान 105°F (40.6°C) पर्यंत वाढतं आणि आपलं शरीर तापमान नियंत्रित करण्याची क्षमता गमावतं. आपल्या शरीराचं नॉर्मल तापमान 98.4°F (37°C) असतं. जास्त गरमीमध्ये ते वाढलं तर हीट स्ट्रोक होऊ शकतो. 

कधी होतो हीट स्ट्रोक?

हीट स्ट्रोकचा धोका सामान्यपणे तेव्हा वाढतो जेव्हा या दिवसांमध्ये गरमीमुळे इतर रोग जसे की, क्रम्प्स आणि हीट एग्जॉस्शन फार जास्त लेव्हलला पोहोचतात. पण अनेकदा ही समस्या कोणत्याही आजाराशिवाय किंवा लक्षणाशिवायही होऊ शकते. यामुळे मेंदुला नुकसानही पोहोचू शकतं.

सामान्यपणे जास्त वेळ उष्णतेत राहिल्यामुळे हीट स्ट्रोक होऊ शकतो. या स्थितीत शरीरातील पाणी कमी होतं आणि हीट कंट्रोल करण्याची शरीराची क्षमता नष्ट होते. याच कारणाने लोकांनी या दिवसात खूप काळजी घेतली पाहिजे आणि शरीर हायड्रेटेड ठेवलं पाहिजे.

कुणाला जास्त धोका

डॉक्टर्स असं सांगतात की, हृदयरोग असलेले, हायपरटेंशन किंवा डायबिटीसच्या रूग्णांनी गरमीमुळे होणाऱ्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. किडनीच्या समस्या असलेल्या लोकांनाही याचा जास्त धोका असतो. त्यामुळे एक्सपर्ट सल्ला देतात की, या दिवसात शरीराचं तापमान वाढलं, मळमळ वाटलं, डोकेदुखी किंवा चक्कर येणे अशा समस्या जाणवल्या तर त्या व्यक्तीच्या शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करा.

हीट एग्जॉस्शनची लक्षण

गरमीमुळे थकवा जाणवणाऱ्या रूग्णांना घाबरल्यासारखं वाटणे, जास्त कमजोरी, बेशुद्ध पडणे, डोकेदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब, सतत मांसपेशीमध्ये वेदना या समस्या आढळतात.

काय कराल उपाय?

दिवसभरात 2 ते 3 लीटर पाणी प्यावे.

बाहेर जायचं असेल तर डोकं, कान, नाक रूमाल किंवा स्कार्फने झाकावे.
सैल आणि कॉटनचे कपडे वापरावे. 

बाहेरून घरात आल्यावर आधी शरीराचं नॉर्मल तापमान होऊ द्या. नंतरच पाणी प्यावे.

बाहेरून घरात आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये किंवा कुलर व एसीच्या हवेत जाऊ नये.

फारच महत्वाचे काम असेल तरच दुपारच्या वेळी बाहेर पडा. अन्यथा सायंकाळी बाहेर जावे.

शरीर थंड राहील अशी फळं, पदार्थ, भाज्या खाव्यात. तळलेले, मसालेदार, भाजलेले पदार्थ खाऊ नका. 

Web Title: What is heat stroke, causes, symptoms and prevantion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.