Hepatitis: AIDS पेक्षाही घातक ठरतो हेपेटायटिस आजार, जाणून घ्या कारणं आणि लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 12:30 PM2023-07-28T12:30:04+5:302023-07-28T12:30:52+5:30
Hepatitis Causes and Symptoms: हेपेटायटिस एक अशी मेडिकल कंडिशन आहे ज्यात लिव्हरवरील सूज खूप वाढते. ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायझेशन म्हणजे WHO च्या आकडेवारीनुसार, जगभरात साधारण 35.4 कोटी लोक याने ग्रस्त आहेत.
Hepatitis Causes and Symptoms: हेपेटायटिस हा एक असा आजार ज्याबाबत फार कधी बोललं जात नाही. पण जर या आजारावर वेळीच उपचार केले नाही तर हा आजार एड्सपेक्षाही घातक ठरू शकतो. कारण बऱ्याच लोकांना या आजारामुळे आपला जीव गमवावा लागतो. हेपेटायटिस एक अशी मेडिकल कंडिशन आहे ज्यात लिव्हरवरील सूज खूप वाढते. ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायझेशन म्हणजे WHO च्या आकडेवारीनुसार, जगभरात साधारण 35.4 कोटी लोक याने ग्रस्त आहेत.
हेपेटायटिसचे प्रकार आणि कसा पसरतो?
हेपेटायटिस ए (Hepatitis A) - दुषित पाणी आणि पदार्थांमुळे पसरतो.
हेपेटायटिस बी (Hepatitis B) - संक्रमित बॉडी फ्लूइडमुळे पसरतो.
हेपेटायटिस सी (Hepatitis C) - संक्रमित बॉडी फ्लूइडमुळे पसरतो.
हेपेटायटिस डी (Hepatitis D) - संक्रमित रक्ताच्या संपर्कात आल्याने पसरतो.
हेपेटायटिस ई (Hepatitis E) - दुषित पाणी आणि पदार्थांमुळे पसरतो.
हेपेटायटिसची लक्षणे
- त्वचेवर पिवळेपणा
- डोळे पिवळे दिसणं
- नखांचा रंग पिवळा होणं
- सतत थकवा
- फ्लूसारखी लक्षण
- डार्क पिवळ्या रंगाची लघवी येणं
- डार्क पिवळ्या रंगाची विष्ठा येणं
- पोटदुखी
- भूक कमी लागणं
- अचानक वजन कमी होणं
कसा कराल बचाव?
हेपेटायटिस फारच घातक ठरू शकतो. त्यामुळे याचा धोका टाळणं फार गरजेचं आहे. जर असं केलं नाही तर जीव गमवावा लागू शकतो. चला जाणून घेऊ बचावाचे उपाय....
1) वॅक्सीन घ्या
हेपेटायटिसपासून बचावासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे आपल्या मुलांना बालपणीच यासंबंधी वॅक्सीन लावा. असं केल्याने हेपेटायटिसचा धोका बराच कमी होतो. पण अजूनही हेपेटायटिस सी आणि ई साठी वॅक्सीन आलेली नाही.
2) व्हायरसपासून बचाव
हेपेटायटिसच्या व्हायरसचं संक्रमण तेव्हा पसरतं जेव्हा एका व्यक्तीच्या शरीरातील फ्यूइड दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात कसंतरी जातं. अशात ज्यांना हा आजार आहे त्यांच्यापासून अंतर ठेवा. यात रेजर, निडल, ब्रश, ब्लडपासून बचाव करणं या गोष्टींचा समावेश आहे.
3) दुषित पाणी आणि अन्न
नेहमी घरातील स्वच्छ पाण्याचं आणि अन्नाचं सेवन करा. बाहेरचे पदार्थ जास्त खाल तर तुम्ही हेपेटायटिसचे शिकार होऊ शकतात.