लिव्हर डिटॉक्स म्हणजे काय आणि काय आहेत याचे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 11:18 AM2024-06-11T11:18:49+5:302024-06-11T11:20:01+5:30

Liver Detox : लिव्हर शरीरातील सगळ्यात मोठ्या अवयवांपैकी असतो आणि शरीरातील कितीतरी कामे लिव्हरच्या माध्यमातून केली जातात.

What is Liver Detox and What are the the natural remedies to detox liver | लिव्हर डिटॉक्स म्हणजे काय आणि काय आहेत याचे उपाय!

लिव्हर डिटॉक्स म्हणजे काय आणि काय आहेत याचे उपाय!

Liver Detox : लिव्हर डिटॉक्स हा शब्द आजकाल अनेकदा ऐकायला मिळतो. पण अनेकांना याचा नेमका अर्थ माहीत नसतो किंवा हे कसं केलं जातं, याने काय होतं हे माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत. लिव्हर डिटॉक्स ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात लिव्हर आतून स्वच्छ केलं जातं म्हणजे त्यातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. जेणेकरून लिव्हरचं काम व्यवस्थित चालावं. 

लिव्हर शरीरातील सगळ्यात मोठ्या अवयवांपैकी असतो आणि शरीरातील कितीतरी कामे लिव्हरच्या माध्यमातून केली जातात. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास लिव्हर मदत करतं. पण अधिक मद्यसेवन किंवा अनहेल्दी पदार्थ खाल्ल्याने लिव्हरवरही दबाव पडतो. लिव्हरमध्ये अनेक विषारी पदार्थ अडकून असतात. ज्यामुळे पुढे लिव्हर खराब होऊ शकतं. अशात लिव्हर डिटॉक्स काही प्रमाणात मदत करतं. 

इतर डिटॉक्सप्रमाणे लिव्हर स्वच्छ करण्यासाठी काही टेप्स असतात. यात तुम्हाला अनेक दिवस उपवास किंवा केवळ ज्यूस किंवा तरल पदार्थ पिण्याचा सल्ला दिला जातो. एक ठराविक आहार किंवा हर्बल सप्लीमेंट घेण्याचीही गरज पडते. 

शरीरातील रक्त शुद्ध करण्याची मोठी जबाबदारी लिव्हरवर असते. लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं. पण या कामात लिव्हरवर खूप जास्त दबाव तयार होतो आणि हळूहळू त्याचं काम कमजोर होतं. यामुळे फॅटी लिव्हर, फेलिअर आणि कॅन्सरही होऊ शकतो. अशात रिकाम्या पोटी काही ड्रिंक्स पिऊन तुम्ही लिव्हर स्वच्छ करू शकता. ज्याला लिव्हर डिटॉक्स म्हणतात.

लिव्हर डिटॉक्स किती फायदेशीर

WebMD च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्हाला लिव्हर डिटॉक्सची गरज आहे. तर तुम्हाला हे माहीत असायला हवं की, याने तुम्हाला फार जास्त मदत मिळत नाही. 

तरीही काही डायटिशिअन काही खास ज्यूसबाबत सल्ला देत असतात जे लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी मदत करतात आणि याने तुमच्या आरोग्यालाही बरेच फायदे मिळतात. अशाच काही ज्यूसबाबत आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

लिव्हर डिटॉक्स ज्यूस

आलं आणि लिंबाचा चहा 

लिंबामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट तत्व असतात आणि आल्यामध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण. या दोन्ही गोष्टी लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर काढतात. तसेच लिव्हरवरील सूजही कमी केली जाते.

हळदीचं पाणी

सूज कमी करणारी हळद लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. यात अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात, जे लिव्हर फेलिअर किंवा कॅन्सरपासून वाचवू शकतात. तुम्ही रोज हळद आणि आल्यापासून तयार पाण्याचं सेवन करू शकता.

बिटाचा रस 

बिटाच्या रसाने शरीरातील सगळे विषारी पदार्थ एका झटक्यात बाहेर काढतं. रोज बिटाचा रस तुम्ही रिकाम्या पोटी प्यावा. याने फॅटी लिव्हर डिजीजपासूनही बचाव होतो.

आवळ्याचा रस 

रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्याल तर याने खूप फायदे होतात. बॉडी डिटॉक्ससाठी आवळ्यात रस फार फायदेशीर असतो. तसेच याने त्वचा आणि केसांनाही अनेक फायदे होतात. लिव्हरच्या आजारांपासूनही बचाव होतो.

Web Title: What is Liver Detox and What are the the natural remedies to detox liver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.