ज्या कॅन्सरने झालं सुब्रतो रॉय यांचं निधन, त्याने सोनाली बेंद्रेही होती पीडित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 10:19 AM2023-11-15T10:19:21+5:302023-11-15T10:32:55+5:30

What Is Metastatic Malignancy: तुम्हाला हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, मेटास्टेटिक मॅलिग्नेंसी काय आहे आणि हा आजार एखाद्या व्यक्ती कशाप्रकारे प्रभावित करतो. 

What is metastatic malignancy rare cancer disease? Subrata Roy sahara and Sonali Bendre suffering from | ज्या कॅन्सरने झालं सुब्रतो रॉय यांचं निधन, त्याने सोनाली बेंद्रेही होती पीडित

ज्या कॅन्सरने झालं सुब्रतो रॉय यांचं निधन, त्याने सोनाली बेंद्रेही होती पीडित

What Is Metastatic Malignancy: सहारा इंडिया परिवाराचे मुख्य सुब्रतो रॉय (Subrata Roy) यांचं 75 व्या वयात निधन झालं. असं सांगण्यात आलं की, ते मेटास्टेटिक मॅलिग्नेंसी नावाच्या कॅन्सरने पीडित होते. काही वर्षांआधी बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) हिनेही सांगितलं होतं की, ती या हाय ग्रेड कॅन्सरची शिकार झाली होती. ज्यावर तिने न्यूयॉर्क आणि मुंबई इथे उपचार घेतले. अशात तुम्हाला हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, मेटास्टेटिक मॅलिग्नेंसी काय आहे आणि हा आजार एखाद्या व्यक्ती कशाप्रकारे प्रभावित करतो. 

काय आहे मेटास्टेटिक मॅलिग्नेंसी?

मेटास्टेटिक कॅन्सरबाबत लोकांना फार कमी माहिती असते. कारण सामान्यपणे सगळ्यांना लंग्स, कोलोरेक्टल, प्रोस्टेट, लिव्हर, सटोमेक, ब्रेस्ट, सर्विक्स आणि लिव्हर कॅन्सरबाबत ऐकायला मिळतं. मेटास्टेटिक मॅलिग्नेंसी एक अॅडव्हांस कॅन्सर आहे. जो अनकंट्रोल्ड सेल्समुळे होतो. हे कॅन्सर सेल्स इफेक्टेड ऑर्गनच्या बेसमेंट मेंबरेनला फाडून बाहेर निघतात. त्यानंतर लिम्फ नोड्स आणि नसांच्या माध्यमातून हाडे, फुप्फुसं, मेंदू आणि लिव्हरद्वारे इतर अवयवांमध्ये पसरतात.

कशी कराल याची ओळख?

मेटास्टेटिक मॅलिग्नेंसी झाला की नाही हे समजणं जरा अवघड आहे. पण तरीही काही लक्षणांच्या माध्यमातून याची ओळख पटवली जाऊ शकते. ही लक्षण इतर दुसऱ्या आजारांमध्येही दिसतात. पण तुम्ही थोडे अलर्ट राहणं गरजेचं आहे. यासाठी एक्सपर्ट डॉक्टरना संपर्क करा आणि आवश्यक टेस्ट करा. 

- लक्षणं

डोकेदुखी

चक्कर येणे

दिसण्यात समस्या

श्वास घेण्यास अडचण

पोटावर सूज

काविळ

चालण्या-फिरण्यात समस्या

अचानक फ्रॅक्चर होने

या टेस्टमधून समजेल

मेटास्टेटिक मॅलिग्नेंसीच्या ट्यूमरची माहिती लिक्विड बायोप्सी नावाच्या ब्लड टेस्टच्या माध्यमातून मिळवू शकता. या टेस्टद्वारे सीए 125, सीईए, सीए 19.9, सर्कुलेटिंग ट्यूमर सेल्स, अल्फा फीटो प्रोटीन आणि लंग्‍स कॅन्सरला डिटेक्ट केलं जाऊ शकतं.

मेटास्टॅटिक मॅलिग्नेंसीवर उपचार

मेटास्टॅटिक मॅलिग्नेंसीवरील उपचार जरा किचकट आहे. यासाठी अनेक मेडिकल प्रॉसेसमधून जावं लागतं. जसे की, कीमोथेरपी, सर्जरी, इम्यूनोथेरेपी आणि रेडिएशन. चांगली ट्रीटमेंट तेव्हाच शक्य आहे जेव्हा याची सुरूवातीच्या स्टेजमध्येच माहिती मिळेल. जर हा कॅन्सर जास्त पसरला तर याला कंट्रोल करणं अवघड होतं. सोनाली बेंद्रेने 2018 मध्ये सांगितलं होतं की, तिला मेटास्टेटिक कॅन्सरवर उपचारासाठी कीमोथेरपी आणि सर्जरी करावी लागली. तेच सुब्रतो रॉय या कॅन्सरमधून वाचू शकले नाहीत. कारण शरीराच्या अनेक अवयवांमध्ये हा कॅन्सर पसरला होता.

Web Title: What is metastatic malignancy rare cancer disease? Subrata Roy sahara and Sonali Bendre suffering from

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.