गूळ आणि ओवा एकत्र खाल्ल्याने काय होतं? जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 11:06 AM2024-09-28T11:06:22+5:302024-09-28T11:06:54+5:30

Jaggery and Ajwain Benefits : नियमितपणे याचं सेवन केल्यास वेगवेगळ्या समस्या दूर होतात. याने लठ्ठपणा कमी होतो आणि पचनक्रियाही सुधारते.

What is the benefit of eating jaggery and Ajwain together? Know the correct method | गूळ आणि ओवा एकत्र खाल्ल्याने काय होतं? जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत...

गूळ आणि ओवा एकत्र खाल्ल्याने काय होतं? जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत...

Jaggery and Ajwain Benefits : बदलत्या वातावरणात गुळाचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. गुळाने सर्दी-खोकला तर दूर होतोच, सोबतच मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनाही कमी होतात. गुळाच्या नियमित सेवनाने शरीरातील आयर्नची कमतरता भरून निघते. नियमितपणे याचं सेवन केल्यास वेगवेगळ्या समस्या दूर होतात. याने लठ्ठपणा कमी होतो आणि पचनक्रियाही सुधारते. अशात जाणून घेऊया गूळ आणि ओव्याचं एकत्र सेवन केल्याने काय फायदे मिळतात.

गूळ आणि ओव्याचं एकत्र सेवन करण्याचे फायदे

पचनक्रिया सुधारते

गूळ आणि ओवा दोन्हींमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं, ज्याने पचन तंत्र चांगलं राहतं. याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊन पोट साफ होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला पचन तंत्र सुधारायचं असेल तर गूळ आणि ओव्याचं सेवन केलं पाहिजे.

मासिक पाळीतील वेदनेपासून आराम

गूळ आणि ओव्याचं सेवन केल्याने मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत मिळते. तसेच यांचं एकत्र सेवन केल्याने ब्लड फ्लो चांगला राहतो. 

कंबरदुखी होईल दूर

ओवा आणि गुळाचं एकत्र सेवन केल्याने कंबरदुखीपासून सुटका मिळवू शकता. हे मिश्रण रोज झोपण्यआधी एक ग्लास कोमट पाण्यात टाकून सेवन करावं. याने कंबरदुखीची समस्या दूर होईल.

सर्दी-खोकला होईल दूर

सर्दी-खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही गूळ आणि ओव्याचं सेवन केलं पाहिजे. याने तुमच्या घशातील खवखव आणि छातीतील आखडलेपणा दूर होईल. 

अस्थमा होईल कमी

अस्थमामुळे वेगवेगळ्या समस्या होतात. अशात गूळ आणि ओव्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. गूळ आणि ओव्याने फुप्फुसातील होणारी सूज कमी करण्यास मदत मिळते. 

Web Title: What is the benefit of eating jaggery and Ajwain together? Know the correct method

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.