चप्पल न घालता चालण्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्, एकदा ट्राय कराच!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 02:57 PM2024-05-18T14:57:10+5:302024-05-18T14:57:43+5:30

अनवाणी चालण्याचे इतके फायदे आहेत जे लोकांना माहितही नसतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

What is the benefits of barefoot walking on streets you should know | चप्पल न घालता चालण्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्, एकदा ट्राय कराच!

चप्पल न घालता चालण्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्, एकदा ट्राय कराच!

Barefoot Walking: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ट्रेंड फेमस होत असतात. सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलॅंडमधील लोक चप्पल न घालता अनवाणी फिरत असल्याची चर्चा होत आहे. हे लोक रस्त्यावर चप्पल न घालता फिरतात आणि ऑफिसमध्येही तसेच जातात. @CensoredMen नावाच्या ट्विटर अकाउंटवरहा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात लोक चप्पल किंवा शूज न घालता फिरताना दिसत आहेत. असं करणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जात आहे. चला जाणून घेऊ याचे फायदे.

पाय मजबूत होतात

चप्पल किंवा शूज न घालता चालल्याने पायांचे मसल्स आणि लिगामंट्स मजबूत होतात. याने पाठीच्या खालच्या भागाला चांगला सपोर्ट मिळतो. चपप्ल न घालता चालल्याने पाय सामान्य स्थितीत राहतात ज्यामुळे टाचांवर कमी दबाव पडतो. तसेच हिप्स, गुडघे आणि पाठीच्या दुखण्याची समस्या दूर होते.

स्ट्रेस होईल कमी

पायात काहीच न घालता चालल्याने स्ट्रेस कमी होतो. चप्पल न घालता चालल्याने मेंदुर स्टिमुलेटिंग इफेक्ट पडतो ज्यामुळे चिंता आणि स्ट्रेस कमी होतो. 

सेंसरी नर्वस चांगलं होणार

पायात चप्पल किंवा शूज घातले तर पायांचे सेंसरी नर्वस कमी अॅक्टिव राहतात. पण चप्पल न घालता चालेल तर पायांचे सेंसरी नर्वस अॅक्टिव राहतात आणि शरीर जास्त सतर्क राहतं.

चांगली झोप येणार

चप्पल न घालता चालल्यामुळे मेंदुवर पडणारा प्रभाव चांगली झोप येण्यास मदत करतो. चांगली झोप येण्यासाठी खासकरून पायात चप्पल न घालता चालण्याचा सल्ला दिला जातो.

इम्यूनिटी मजबूत होईल

चप्पल न घालता चालल्याने इम्यूनिटी मजबूत होते. असं केल्याने जुन्या वेदनाही दूर होतात. तसेच याने डोळ्यांची दृष्टीही चांगली होते.
 

Web Title: What is the benefits of barefoot walking on streets you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.