एक चमचा तूप अन् चिमूटभर हळदीचं सेवन केल्यास काय होतं? आपले पूर्वजही करायचे 'हा' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 12:09 PM2024-11-08T12:09:56+5:302024-11-08T12:10:27+5:30
Ghee With Turmeric : जर तुम्ही एक चमचा तुपात चिमूटभर हळद टाकून सेवन केलं तर आरोग्याला भरपूर फायदे मिळू शकतात. तसेच अनेक आजारांचा धोकाही टाळता येतो.
Health Benefits of Ghee With Turmeric : भारतीय घरांमध्ये तूप आणि हळदीला फार महत्वाचं स्थान आहे. आयुर्वेदात या दोन्ही गोष्टींना खूप फायदेशीर मानलं गेलं आहे. तुपाचं आणि हळदीचं सेवन लोक रोज वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात. मात्र, जर तुम्ही एक चमचा तुपात चिमूटभर हळद टाकून सेवन केलं तर आरोग्याला भरपूर फायदे मिळू शकतात. तसेच अनेक आजारांचा धोकाही टाळता येतो.
रोज तुपात चिमूटभर हळद टाकून सेवन करणं हा एक फार जुना उपाय आहे. याने शरीराला आतून पोषण मिळतं आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. अशात एक चमचा तुपात चिमूटभर हळद टाकून सेवन केल्याने काय होतं, हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
तुपात हळद टाकून सेवन करण्याचे फायदे
इम्यूनिटी बूस्ट होते
हळदीमध्ये आढळणारं करक्यूमिन तत्व एक शक्तिशाली अॅंटी-ऑक्सिडेंट आहे. जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. जेव्हा हे तुपासोबत मिळून सेवन केलं जातं तेव्हा याचा फायदा डबल मिळतो. ज्यामुळे शरीराचा अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.
हाडांचं दुखणं होईल दूर
तूप आणि हळदीचं मिश्रण हे शरीरातील सूज कमी करण्यास आणि संधिवाताचं दुखणं दूर करण्यास मदत करतं. यातील अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण आर्थरायटिसच्या रूग्णांसाठी खासकरून फायदेशीर असतं. हळदीचं तुपासोबत सेवन केल्याने हाडं मजबूत होतात आणि वेदनाही कमी होतात.
पचन तंत्र सुधारतं
तुपाने पोटात एक नॅचरल चिकटपणा तयार होतो. तर हळदीमध्ये पचनासंबंधी समस्या दूर करण्याची क्षमता असते. अशात या दोन्हींचं एकत्र सेवन केल्यास पचन तंत्र मजबूत होतं. तसेच बद्धकोष्ठता, अॅसिडिटीसारख्या समस्याही दूर होतात. याचं नियमित सेवन केलं तर पचनक्रिया सुधारते.
सुरकुत्या दूर होतील
हळद आणि तुपाच्या मिश्रणाचं सेवन केलं तर शरीर आतून शुद्ध होतं आणि त्वचा नॅचरल पद्धतीने चमकू लागते. हळदीमधील अॅंटी-ऑक्सिडेंट गुण त्वचेचं वय वाढवण्याचं काम करतात आणि तुपाने त्वचा मुलायम होते. यांचं एकत्र सेवन केल्याने त्वचेला नवीन चमक मिळते.
हृदयासाठी फायदेशीर
तुपामध्ये हेल्दी फॅटी अॅसिड असतं जे हृदयाला पोषण देण्याचं काम करतं. हळदीने शरीरातील रक्तप्रवाह देखील सुरळीत होतो आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी कंट्रोल राहते. या दोन्ही गोष्टी हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.
कसं कराल सेवन?
सकाळी किंवा कोणत्या जेवणासोबत एक चमचा तुपात चिमूटभर हळद टाकून सेवन करा. तूप आणि हळद तुम्ही दुधात टाकूनही सेवन करू शकता. या उपायाने आरोग्य तर चांगलं राहतंच, सोबतच शरीराला ऊर्जा मिळते आणि तुम्ही फ्रेश राहता.