आयुर्वेद डॉक्टरांनुसार भात शिजवण्याची योग्य पद्धत, कितीही खाल्ला तरी वाढणार नाही वजन!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 09:35 AM2024-05-28T09:35:05+5:302024-05-28T09:35:50+5:30
आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी सांगितलं की, भात शिजवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असेल तर भात खाऊनही तुमचं वजन वाढणार नाही.
अलिकडे चुकीच्या लाइफस्टाईलमुळे लोक वजन खूप जास्त वाढत असलेल्या समस्येने हैराण आहेत. अशात लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. कुणी एक्सरसाइज, योगा करतात तर कुणी एक वेळचं जेवण बंद करतात. तसेच काही लोक भात खाणंही बंद करतात. कारण त्यांचा असा समज होतो की, भात खाल्ल्याने त्यांचं वजन आणखी वाढतं. पण खरंच भात खाल्ल्याने वजन वाढतं का? अशात आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी सांगितलं की, भात शिजवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असेल तर भात खाऊनही तुमचं वजन वाढणार नाही.
वेगवेगळ्या आजारांवर आयुर्वेदिक उपाय सांगणारे डॉक्टर शिंदे यांनी भाज शिजवण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी सांगितलं की, या पद्धतीने जर तुम्ही भात शिजवला आणि तो खाल्ला तर तुमचं वजन कधीच वाढणार नाही.
भात शिजवण्याची योग्य पद्धत
डॉक्टर विलास शिंदे म्हणाले की, सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भात शिजवण्यासाठी प्रेशर कूकरचा वापर करायचा नाही. पातेल्यात भात शिजवा. आधी प्रेशर कुकर नव्हते. लोक पातेल्यात भात शिजवत होते. भात शिजवताना त्यात जो फेस येतो तो काढून टाका. भात शिजवत असताना तांदळाच्या पाण्यावर येणारा फेसच लठ्ठपणासहीत अनेक आजारांचं कारण बनतो. त्यामुळे भात नेहमी पातेल्यात शिजवा.
साऊथमधील लोक भात खाऊनही लठ्ठ का नाही?
काही दिवसांआधी एका एक्सपर्टनी सांगितलं की, साऊथमधील लोक भरपूर भात खातात तरीही त्यांना काही होत नाही किंवा ते लठ्ठही होत नाहीत. इतर राज्यातील लोक थोडा भात खात असतील तरी त्यांचं वजन वाढतं. याचं एक मोठं कारण म्हणजे साऊथमध्ये तांदळाला पॉलिश केलं जात नाही. इतर राज्यांमध्ये पांढरा तांदूळ दोन ते तीन वेळा पॉलिश केला जातो. जो अनेक आजारांचं कारण ठरतो.