ब्रश करण्याची 'ही' आहे सगळ्यात बेस्ट वेळ; दातांचं दुखणं, पिवळेपणा अन् कीडही होईल दूर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 10:19 AM2024-10-05T10:19:24+5:302024-10-05T10:19:53+5:30
बरेच लोक रात्री झोपण्याआधी ब्रश करत नाहीत. जर तुम्हीही असंच करत असाल तुम्ही एक मोठी चूक करताय. कारण रात्री झोपण्याआधी ब्रश केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात.
Brushing Teeth At Night: दात आणि तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी डेंटिस्ट सामान्यपणे दिवसातून दोन वेळा ब्रश करण्याचा सल्ला देत असतात. जास्तीत जास्त लोक सकाळी झोपेतून उठल्यावर ब्रश करतात. पण रात्री झोपण्याआधी ब्रश करत नाहीत. जर तुम्हीही असंच करत असाल तुम्ही एक मोठी चूक करताय. कारण रात्री झोपण्याआधी ब्रश केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात.
रोज रात्री ब्रश केल्याने तुमची दात जास्त स्वच्छ राहतील, सोबतच हिरड्याही मजबूत होतील. तसेच दात आणि हिरड्यांसंबंधी अनेक आजारांचा धोकाही यामुळे कमी होतो. अशात आज आम्ही तुम्हाला झोपण्याआधी ब्रश करण्याचे फायदे सांगणार आहोत.
दुर्गंधी होईल दूर
रात्री झोपण्याआधी ब्रश न केल्याने आपल्या तोंडात दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया जमा होतात. जर तुम्ही झोपण्याआधी ब्रश कराल तर बॅक्टेरियांना वाढण्यासाठी अनुकूल वातावरण मिळणार नाही. याचा फायदा तुम्हाला असा होईल की, तुमच्या तोंडाची दुर्गंधी येणार नाही.
हिरड्या राहतील मजबूत
रात्री ब्रश न केल्याने तोंडात बॅक्टेरिया जमा होतात आणि यामुळे दातांसोबतच हिरड्यांचं देखील नुकसान होतं. तोंडात जास्त बॅक्टेरिया असतील तर याने हिरड्या कमजोर होऊ शकतात. रोज रात्री ब्रश केल्याने हिरड्यांची मालिश होते आणि ते मजबूत राहतात.
चांगली झोप
रोज रात्री ब्रश केल्याने तोंडाचं आरोग्य चांगलं तर राहतंच, सोबतच तुमच्या झोपेची गुणवत्ता देखील सुधारते. रोज रात्री ब्रश केल्याने दात आणि हिरड्या निरोगी राहतात, ज्यामुळे कोणतीही वेदना किंवा अस्वस्थतेशिवाय तुम्हाला चांगली झोप येईल.
सडणार नाहीत दात
रात्री जेव्हा आपण काही गोड खातो आणि ब्रश न करताच झोपतो तेव्हा दातांना कीड लागण्याची शक्यता जास्त असते. दातांमध्ये चिकटलेले किंवा अडकलेले कण बॅक्टेरिया खातात. अशात अॅसिडचं उत्पादन होतं, जे दातांचं नुकसान करतं. अशात दातांना कीड लागू नये यासाठी रोज रात्री ब्रश करावा.