आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 04:13 PM2024-06-03T16:13:00+5:302024-06-03T16:14:12+5:30

लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत आणि ते कोणत्या वेळी पिणे चांगले आहे हे जाणून घ्या. 

what is the best time to drink lemon water | आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ

आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ

उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त तहान लागते. त्यामुळे पाणी पिण्याबरोबरच लिंबू पाणी, नारळ पाणी, फळांचा रस, ताक अशा गोष्टी पिण्याचा सल्ला दिला जातो. अशातच लठ्ठपणा ही आजकाल समस्या बनली आहे. जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींशी संबंधित चुकांमुळे लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. वजन कमी करण्यासाठी बरेच लोक लिंबू पाणी पितात. मात्र लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत आणि ते कोणत्या वेळी पिणे चांगले आहे हे जाणून घ्या. 

एका ग्लास पाण्यात मध मिसळून लिंबाचा रस पिणं खूप फायदेशीर असल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात. लिंबूमध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असतं. हे फ्री रेडिकल्सपासून लढण्यासाठी मदत करतं. यामुळे आपली त्वचा देखील चांगली राहते. रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर लिंबू पाणी प्यायला सुरुवात करा. त्यात व्हिटॅमिन सी तसेच अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात.

लिंबू पाणी प्यायल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाच्या समस्या दूर होतात. तज्ज्ञांच्या मते, सकाळी नाश्त्यादरम्यान लिंबू पाणी प्यायला हवं. या वेळेत लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. पाणी प्यायल्याने शरीराचं अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होतं. यामुळेच नियमितपणे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्याच्या दिवसात जास्त तहान लागते. पुन्हा पुन्हा पाणी प्यावसं वाटतं.

सतत गरम होतं असल्याने, घाम येत असल्याने शरीराला पाण्याची आवश्यकता असते. पण जर तुम्हाला खूप जास्त तहान लागत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण ते काही आजारांचं कारण असू शकतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अनेक लोक तहान भागवण्यासाठी अनेक ग्लास पाणी पितात. थंड ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक आणि सतत पाणी पिऊनही त्यांना घशाला कोरड पडल्याचं जाणवतं. या स्थितीकडे अजिबात दुर्लक्ष केलं जाऊ नये, कारण ते धोकादायक असू शकतं.

Web Title: what is the best time to drink lemon water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.