आयुर्वेदानुसार रात्री झोपण्यासाठी सगळ्यात योग्य वेळ कोणती? वाचाल तर रहाल फायद्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 12:14 PM2024-08-13T12:14:21+5:302024-08-13T12:49:36+5:30

Right time to sleep : झोप येण्यासाठी बाजारात अनेक औषधं मिळतात, पण आयुर्वेदानुसार झोपण्यासोबतच झोपण्याची वेळही महत्वाची आहे.

What is the best time to sleep at night according to Ayurveda | आयुर्वेदानुसार रात्री झोपण्यासाठी सगळ्यात योग्य वेळ कोणती? वाचाल तर रहाल फायद्यात...

आयुर्वेदानुसार रात्री झोपण्यासाठी सगळ्यात योग्य वेळ कोणती? वाचाल तर रहाल फायद्यात...

Right time to sleep : दिवसातील २४ तासांपैकी किमान ७ ते ८ तास झोप घेणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. जर चांगली झोप झाली तर आरोग्य चांगलं राहतं. झोप जर योग्य पद्धतीने होत नसेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. झोप येण्यासाठी बाजारात अनेक औषधं मिळतात, पण आयुर्वेद किंवा नॅचरोपॅथीमध्ये यावर सोपे आणि सरळ उपाय आहेत. इतकंच नाही तर झोपण्याची योग्य वेळही सांगण्यात आली आहे. 

आयुर्वेदात उपचार व्यक्तीची प्रकृती बघूनच केले जातात. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, वात, पित्त आणि कफ या तिघांचं जेव्हा बॅलन्स बिघडतं तेव्हाच कुणी आजारी पडतं. आयुर्वेदात योग्य जीवनशैलीला फार महत्वं आहे.

निरोगी जीवनाचे तीन स्तंभ

१) पौष्टिक आहार

२) पुरेशी झोप

३) इंद्रियांवर नियंत्रण

जेवणानंतर झोप येणं ही एक सामान्य बाब आहे. जर झोप कमी झाली तर शरीराचं तंत्र बिघडतं. झोप न झाल्याने तब्येत तर बिघडतेच सोबतच याने मानसिक आरोग्य देखील खराब होतं.

चांगली झोप का आहे गरजेची?

तर तुम्ही रात्री ७ ते ८ तासांची झोप घेतली नाही तर दुसऱ्या तुमची काम करण्याची क्षमता कमी होते. जर तुम्ही रात्री चांगली झोप घेतली तर तुमचं चित्त शांत राहतं. दुसऱ्या दिवशी शरीरात भरपूर एनर्जी राहते आणि तुम्हालाही फ्रेश वाटतं. त्यामुळे पुरेशी झोप महत्वाची ठरते.

आयुर्वेदात झोपेला बलवर्धक म्हटलं गेलं आहे. चांगली झोप घेतल्याने इम्यूनिटीही बूस्ट होते. जर झोप पूर्ण झाली नसेल तर व्यक्तीचं वजन कमी होऊन ती आजारी पडू शकते. तसेच जागी राहिल्यावर जास्त खाऊन ते जाडही होऊ शकतात. चांगल्या झोपेने लैंगिक जीवनही हेल्दी राहतं.

रात्री झोपण्याची योग्य वेळ

प्रयत्न तर हाच असला पाहिजे की, रोज रात्री तुम्ही ९ ते १० वाजतादरम्यान झोपावं आणि सकाळी ४ ते ५ वाजता उठावं. आयुर्वेदात झोपण्यासाठी हीच वेळ सगळ्यात चांगली मानलं जातं. जर काही कारणाने या वेळेत झोपू शकत नसाल तर ६ ते ८ तासांची झोप पूर्ण करूनच उठावं. 

झोपण्याआधी आंघोळ

उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात रात्री झोपण्याआधी कोमट पाण्याने आंघोळ करावी. याने तुम्हाला फ्रेश वाटेल. जर आंघोळ करणं शक्य नसेल तर पाण्याने चेहरा, डोकं, काख, पाय, हाय चांगले धुवावे. तेच जर हिवाळ्यात आंघोळ करणं शक्य नसेल तर गरम पाण्याने चेहरा आणि पाय धुवावे. याने पायांच्या मांसपेशींना आराम मिळतो आणि रात्री चांगली झोप लागते.

Web Title: What is the best time to sleep at night according to Ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.