'Best Before' आणि 'Expiry Date' चा अर्थ एकच आहे का? FSSAI ने सांगितला दोन्हीतील फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 04:40 PM2024-06-03T16:40:01+5:302024-06-03T16:40:48+5:30

'Best Before' and 'Expiry Date' : आजकाल या गोष्टी जास्त चेक केल्या जातात. पण आजही अनेकांना 'Best Before' आणि 'Expiry Date' यांमधील फरक माहीत नसतो.

What is the difference between best before date and expiry date, you should know | 'Best Before' आणि 'Expiry Date' चा अर्थ एकच आहे का? FSSAI ने सांगितला दोन्हीतील फरक

'Best Before' आणि 'Expiry Date' चा अर्थ एकच आहे का? FSSAI ने सांगितला दोन्हीतील फरक

'Best Before' and 'Expiry Date' : सामान्यपणे जेव्हाही आपण एखाद्या दुकानातून किंवा मॉलमधून एखाद्या पॅकेटची किंवा पदार्थाच्या पॅकेटची किंवा औषधांची खरेदी करतो तेव्हा त्यावरील 'Best Before' आणि 'Expiry Date' नक्कीच बघतो. कारण आपल्याला पैसे देऊन चांगल्या आणि आरोग्याला नुकसान न पोहोचवणाऱ्या गोष्टी खरेदी करायच्या असतात. 

आजकाल या गोष्टी जास्त चेक केल्या जातात. पण आजही अनेकांना 'Best Before' आणि 'Expiry Date' यांमधील फरक माहीत नसतो. दोन्ही गोष्टी एकच असल्याचं अनेकांना वाटत असतं. पण मुळात असं नाहीये. दोन्हीमध्ये फरक आहे. FSSAI म्हणजेच Food Safety and Standards Authority of India ने याबाबतची माहिती शेअर केली आहे. 

Manufacturing Date म्हणजे काय?

सामान्यपणे कोणत्याही पदार्थाच्या पॅकेटवर मॅन्युफॅक्चरिंग डेट लिहिलेली असते. ही तारखी हे दर्शवते की, हे कधी तयार करण्यात आलंय आणि पॅक कधी करण्यात आलंय. यावरून हे स्पष्ट होतं की, पदार्थ किती दिवसांआधी तयार करण्यात आला होता.

Best Before Date म्हणजे काय?

कोणत्याही पॅकेटवर लिहिलेलं Best Before Date हे दर्शवतं की, या खाण्याची टेस्ट, सुगंध आणि टेक्शचर कधीपर्यंत चांगलं राहणार आणि यातील पोषक तत्व कधीपर्यंत कायम राहतील. पण असं काही गरजेचं नसतं की, एखाद्या पदार्थाच्या पॅकेटवरील बेस्ट बिफोर डेट निघून गेली असेल तर तो पदार्थ नुकसानकारकच असेल. तो पदार्थ खाण्या लायकही असू शकतो. त्यामुळे याला बेस्ट बिफोर डेट म्हटलं जातं. म्हणजे एखादा पदार्थ जेव्हा बनवला त्या दिवसापासून पुढे किती दिवस त्याची टेस्ट, सुगंध चांगला राहणार.

Expiry Date काय असते?

Expiry Date चा अर्थ होतो की, या तारखेनंतर तो पदार्थ किंवा औषध खाण्या लायक नाही. जर त्याचं सेवन केलं तर त्याने आरोग्य बिघडू शकतं. कोणत्याही पॅकेटमधील पदार्थ एक्सपायर होणं याचा अर्थ हाच होतो की, आता तो पदार्थ किंवा औषध खाण्या लायक नाही. एक्सपायरी डेट गेल्यावरही तुम्ही त्याचं सेवन केलं तर आरोग्याला मोठं नुकसान होऊ शकतं. ते फेकून द्यावे. एक्सपायर झालेल्या गोष्टी प्राण्यांनाही खायला देऊ नका. त्यांचं आरोग्य यामुळे बिघडू शकतं.

म्हणजे तुम्हाला आता हे स्पष्ट झालं असेल की, Best Before Date पॅकेटमधील पदार्थाची टेस्ट आणि टेक्सचरबाबत माहिती देतं. पण यातून हे नाही समजत की, तो पदार्थ खाण्यासाठी सुरक्षित आहे किंवा नाही. पण Expiry Date हे दाखवते की, पदार्थ आता खाण्यासाठी सुरक्षित नाही आणि ते खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकतं.

Web Title: What is the difference between best before date and expiry date, you should know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.