हे आहे डायबिटीसचं पहिलं लक्षण, दुर्लक्ष केलं तर होऊ शकते गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 09:14 AM2023-09-05T09:14:11+5:302023-09-05T09:14:26+5:30

First Sign Of Diabetes:डायबिटीस झाल्यावर रक्तात शुगरची लेव्हल वाढते आणि याची लेव्हल वाढत राहिली तर अनेक गंभीर समस्या होऊ शकतात.

What is the first sign of diabetes 2 you should know this | हे आहे डायबिटीसचं पहिलं लक्षण, दुर्लक्ष केलं तर होऊ शकते गंभीर समस्या

हे आहे डायबिटीसचं पहिलं लक्षण, दुर्लक्ष केलं तर होऊ शकते गंभीर समस्या

googlenewsNext

First Sign Of Diabetes: डायबिटीस हा एक फारच गंभीर आणि वेगाने वाढणारा आजार आहे. ज्यावर कोणताही ठोस उपचार नाही. डायबिटीस फक्त कंट्रोल केला जाऊ शकतो तो पूर्णपणे नष्ट केला जाऊ शकत नाही. डायबिटीस झाल्यावर रक्तात शुगरची लेव्हल वाढते आणि याची लेव्हल वाढत राहिली तर अनेक गंभीर समस्या होऊ शकतात.

डायबिटीस दोन प्रकारचे असतात. डायबिटीस 1 ज्यात रूग्णाला पूर्णपणे इन्सुलिनवर डिपेंड रहावं लागतं. दुसरा प्रकार डायबिटीस 2 ज्यात शरीर ग्लूकोजला योग्यपणे मॅनेज करू शकत नाही. यामुळे रक्तात याचं प्रमाण वाढत राहतं.

एक्सपर्ट सांगतात की, डायबिटीसच्या लक्षणांची ओळख वेळेवर पटवणं फार गरजेचं आहे. कारण डायबिटीसला रिवर्स केलं जाऊ शकतं. डायबिटीस तेव्हाच रिवर्स करता येतो जेव्हा ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल पेक्षा अधिक होते. पण इतकीही नसते की, याला डायबिटीस म्हणता येईल. चला जाणून घेऊ काही लक्षणे.

डायबिटीसचं पहिलं लक्षण

मेयो क्लीनिकच्या रिपोर्टनुसार, डायबिटीसची अनेक सामान्य लक्षणं आहेत. पण असं मानलं जातं की, पुन्हा पुन्हा लघवी येणे हे डायबिटीसचं पहिलं लक्षण होऊ शकतं. असं होतं कारण जेव्हा ब्लड शुगर लेव्हल वाढते, तेव्हा किडनी शुगरला ब्लडमधून फिल्टरकडून काढण्याचा प्रयत्न करतात. यामुळे व्यक्तीला पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागतं. खासकरून रात्रीच्या वेळी.

जास्त तहान आणि भूक लागणं

ब्लडमधून शुगर काढण्यासाठी पुन्हा पुन्हा लघवी केल्याने शरीरात पाण्याची कमतरता होते. यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकतं आणि तुम्हाला सामान्यपेक्षा जास्त तहान लागू शकते. तसेच डायबिटीस असेल तर जेवणातून पुरेशी ऊर्जा मिळत नाही. टाइप 2 डायबिटीस असणाऱ्या लोकांना सतत भूक लागते. भलेही आधी त्यांनी कितीही खाल्लं असेल तरीही.

थकवा आणि कमजोरी

टाइप 2 डायबिटीस रूग्णाच्या ग्लूकोज लेव्हलला प्रभावित करू शकतो आणि यामुळे त्याना थकवा व कमजोरी जाणवू शकते. तसेच रक्तात ग्लूकोजची लेव्हल वाढली तर याने डोळ्यांच्या छोट्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचू शकतं. ज्यामुळे धुसर दिसतं. ही समस्या एक किंवा दोन्ही डोळ्यांना होऊ शकते.

इतर काही लक्षणं

नेहमीच चिडचिडपणा करणं किंवा मूड सतत बदलत राहणं

बघण्यात समस्या आणि धुसर दिसणं

जखमा लवकर बऱ्या न होणं

जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो किंवा तुमच्यात डायबिटीसची काही लक्षण दिसत असतील तर तुम्ही वेळीच डॉक्टरांना भेटायला हवं. वेळीच उपचार सुरू कराल तर अनेक गंभीर समस्यांपासून वाचाल.

Web Title: What is the first sign of diabetes 2 you should know this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.