काळ्या हळदीचे एकापेक्षा एक फायदे, अनेक गंभीर आजारांवर ठरते रामबाण उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 11:00 AM2024-09-24T11:00:21+5:302024-09-24T11:00:51+5:30

Black Turmeric : सामान्यपणे सगळ्यांना हेच वाटतं की, हळद की केवळ पिवळ्या रंगाची असते. पण असं नाहीये. हळद काळ्या रंगाची सुद्धा असते आणि या हळदीचेही आरोग्याला अनेक फायदे होतात.

What is the health benefits and nutritional value of black turmeric | काळ्या हळदीचे एकापेक्षा एक फायदे, अनेक गंभीर आजारांवर ठरते रामबाण उपाय...

काळ्या हळदीचे एकापेक्षा एक फायदे, अनेक गंभीर आजारांवर ठरते रामबाण उपाय...

Black turmeric Benefits : हळदीला आयुर्वेदात फार महत्व आहे. कारण यात अनेक गंभीर समस्या दूर करण्याचे गुण असतात. यामुळेच एक्सपर्ट्स दररोज काही प्रमाणात याचं सेवन करण्यास सांगतात. हळदीचा विषय निघतात एक पिवळ्या रंगाचं पावडर डोळ्यांसमोर येतं. सामान्यपणे सगळ्यांना हेच वाटतं की, हळद की केवळ पिवळ्या रंगाची असते. पण असं नाहीये. हळद काळ्या रंगाची सुद्धा असते आणि या हळदीचेही आरोग्याला अनेक फायदे होतात. 

काळ्या हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅंटीऑक्सीडेंट असतात. याचं वैज्ञानिक नाव आहे Curcuma caesia. मणिपूर आणि काही राज्यांमध्ये लोकांसाठी याचं खास महत्व आहे. इथे याच्या मुळापासून तयार केलेल्या पेस्टने जखमा भरणे, साप किंवा विंचू चावल्यावर लावली जाते.

काळ्या हळदीचे फायदे...

एका रिसर्चनुसार, फार कमी लोकांनाच काळ्या हळदीबाबत माहीत आहे. ही आयुर्वेदातील महत्वाच्या जडीबुटींपैकी एक आहे. यात अनेक प्रकारचे औषधी गुण आढळून येतात. ज्यात अ‍ॅंटी-फंगल, अ‍ॅंटी-अस्थमा, अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट, एनाल्जेसिक, लोकोमोटर, डिप्रेसेंट, अ‍ॅंटी-कॉन्वेलसेंट, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-अल्सर आणि मांसपेशींना आराम देणारा प्रभाव, चिंताजनक आणि सीएनएस डिप्रेशन दूर करणारे गुण प्रामुख्याने आढळतात. ज्याने अनेक आजारांपासून बचाव होतो.

फुप्फुसाचा आजार होईल दूर

काळ्या हळदीचा वापर फुप्फुसांची समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरतो. यातील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्समुळे ताप, जुना खोकला दूर होतो. यासाठी कोमट पाण्यात काळी हळद टाकून सेवन करावं. 

मायग्रेनमध्ये मिळतो आराम

मायग्रेनची समस्या जास्तकरून महिलांमध्ये बघायला मिळते. पण हा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. यात डोक्याच्या मागे एका भागात असह्य वेदना होतात. मायग्रेनने पीडित व्यक्ती मोठा आवाज आणि प्रकाशाने संवेदनशील होते. काळी हळद या समस्येत आराम देऊ शकते. आरामासाठी ताज्या हळदीचा लेप तयार करून कपाळावर लावा.

मासिक पाळीतही फायदेशीर

अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान असह्य वेदनांचा सामना करावा लागतो. अशात काळ्या हळदीतील अ‍ॅंटी इनफ्लेमेट्री गुण आराम देतात. यासाठी गरम दुधात काळ्या हळदीचं पावडर मिश्रीत करून पिण्याचा सल्ला देतात.

पंचनासंबंधी समस्या होते दूर

काळी हळद गॅस्ट्रिक समस्यांपासून सुटका मिळवून देण्याचं काम करते. अ‍ॅसिड रिफ्लक्स, गॅस, सूज, उचकी, अपचन, अल्सर, गॅस्ट्रिक इश्यू आहे. अनेक रूटीन बिघडल्याने आणि खाण्या-पिण्यामुळे ही समस्या होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी काळ्या हळदीचं योग्य प्रमाणात सेवन पाण्यासोबत करावं.

Web Title: What is the health benefits and nutritional value of black turmeric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.