दाढी करण्याची योग्य पद्धत कशी आहे? डर्मेटोलॉजिस्टने सांगितली योग्य पद्धत!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 10:30 AM2024-07-19T10:30:07+5:302024-07-19T10:31:52+5:30
योग्य पद्धतीने शेविंग कशी करावी याबाबत डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटोसर्जन डॉक्टर अग्नि कुमार बोस यांनी काही टिप्स सांगितल्या आहे.
Skin Care : दाढी वाढली केली शेविंग करावी लागते. बरेच पुरूष घरीच शेविंग करतात. पण अनेकदा शेविंग करताना गाल, मानेवर कापल्याचे निशाण दिसतात. असं तेव्हा होतं जेव्हा शेविंग योग्य पद्धतीने केली जात नाही. अशात योग्य पद्धतीने शेविंग कशी करावी याबाबत डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटोसर्जन डॉक्टर अग्नि कुमार बोस यांनी काही टिप्स सांगितल्या आहे.
दाढी शेविंग करण्याची योग्य पद्धत
डॉ. अग्नि यांनी सांगितलं की, शेविंगचा एकच नियम आहे तो म्हणजे हे लक्षात ठेवणं की, केसांच्या वाढीवर लक्ष ठेवा. केस जर गालापासून तिरप्या दिशेने खालच्या बाजूने वाढत असेल आणि गळ्यावरील केस वरच्या दिशेने वाढत असेल तर गालाजवळ रेजर वरून खालच्या दिशेने फिरवायचं आहे आणि गळ्यावर रेजर खालून वरच्या दिशेने फिरवायचं आहे. जर पूर्ण चेहरा असाच असा वरून खालच्या दिशेने रेजर फिरवत शेविंग केली तर ज्या ठिकाणी केसांच्या वाढीच्या उलट्या दिशेने रेजर फिरवला गेला तर तिथे इनग्रोन हेअर निघू लागतील.
डॉ. अग्नि यांचं मत आहे की, ही बाब तरूणींसोबत वॅक्सिंग करतेवेळी होते जेव्हा त्या हातावर वॅक्स करतात. हातावर लाल रंगाची पुरळ येऊ लागते, ज्यामुळे वेदना होते, खाज येते आणि इरिटेशनही होतं.
डॉ. अग्नि यांनी सांगितलं की, महिलाही आपल्या चेहऱ्यावर शेविंग करू शकतात. अनेक म्हटलं जातं की, शेविंग केल्याने चेहऱ्यावर जाड केस येऊ लागतात. त्यामुळे महिलांनी चेहऱ्यावर शेविंग करू नये. पण डॉक्टर हा एक गैरसमज असल्याचं म्हणाले.
या गोष्टींचीही घ्या काळजी
दाढी शेविंग करताना काही आणखी सामान्य गोष्टींची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. जसे की, दाढी शेविंग करण्याआधी त्वचेची काळजीही महत्वाची आहे. चेहरा चांगल्या पद्धतीने स्वच्छ केल्याने शेविंग चांगली करता येईल.
शेविंगसाठी चांगल्या क्वालिटीच्या रेजरचा वापर करणं गरजेचं आहे. खराब
क्वालिटीच्या रेजरने केस लवकर निघत नाहीत आणि स्किनवर डाग पडू शकतात आणि इरिटेशन वाढते.
ड्राय शेविंग टाळा. शेविंग करताना साबणं किंवा शेविंग क्रीमचा फेस लावला तर बरं होईल. याने त्वचा कापण्याचा धोका ठळतो.
शेविंग करताना त्वचेवर फार जास्त प्रेशर देऊ नका. हलक्या हाताने शेविंग करा.
शेविंग केल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्ररायजर लावणं गरजेचं आहे. त्वचा हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे.