'या' वयात आई होणं आवश्यक, नाहीतर...; आई-बाबा होण्याचे योग्य वय कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 07:46 AM2022-03-02T07:46:04+5:302022-03-02T07:47:00+5:30

अंबाजोगाई : शिक्षण आणि करिअर या दोन्हींमध्ये स्पर्धेच्या युगात आता लग्न उशिरा करणाऱ्या मुलामुलींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ...

What is the right age to be a parent ?, the doctor said | 'या' वयात आई होणं आवश्यक, नाहीतर...; आई-बाबा होण्याचे योग्य वय कोणते?

'या' वयात आई होणं आवश्यक, नाहीतर...; आई-बाबा होण्याचे योग्य वय कोणते?

googlenewsNext

अंबाजोगाई : शिक्षण आणि करिअर या दोन्हींमध्ये स्पर्धेच्या युगात आता लग्न उशिरा करणाऱ्या मुलामुलींची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आपोआपच त्यांच्याकडून मुलं होऊ देण्याचे वय देखील वाढत जाते. यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचा सामनाही भविष्यात त्या दोघांना करावा लागतो. या समस्यांचा सामना टाळण्यासाठी मुला-मुलींचे लग्न अगदी योग्य वयात होऊन आई-बाबा होण्यासाठी जन्माला येणारी मुलेही त्यांच्या वयाच्या २२ ते ३५ वर्षांच्या दरम्यानच जन्माला आली पाहिजेत, असे डॉक्टर्स सांगतात.

२५-२६ पासून सुरू होतो लग्नाचा विचार

प्रत्येक मुलगा किंवा मुलगी ही आपल्या शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर पदवी, पदव्युत्तर किंवा इतर विविध विभागातील कोर्सेसच्या शिक्षणाकडे वळून ते एखादी कायमस्वरूपी किंवा खासगी नोकरी मिळविण्यासाठी वयातील २५ ते २६ वर्षे खर्च करतात. यादरम्यान त्यांना फक्त शिक्षणाची व नोकरीचीच ओढ लागलेली असते. त्यामुळे ते लग्नाचे वय विसरून जातात. या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर ते आपला जीवनसाथी शोधण्याचा प्रयत्न करतात.

आधी करियर मग मूल

सध्या प्रत्येक गोष्टीत स्पर्धा वाढली आहे. दोघेही पती-पत्नी नोकरी करतात. आजच्या पिढीला गाडी, बंगला, सर्व भौतिक सुविधा तत्काळ आवश्यक आहेत. या सर्व सोयी, सुविधा उपलब्ध झाल्यास मुलांचा विचार ही नवी जीवन पद्धती अस्तित्वात येत आहे.

आई होण्यासाठी २२ ते ३२ वय योग्य

मुलींचे लग्न हे वयाच्या अठराव्या वर्षी केले तरी चालते. त्यानंतर मात्र तिचे आई होण्याचे वय हे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते २२ ते जास्तीत जास्त ३२ इतके असते. यादरम्यान तिने आई होणे आवश्यक असते. नाही तर इतर महाभयंकर समस्यांना तिला सामोरे जावे लागते.

बाबा होण्यासाठी २२ ते ३५ योग्य वय

मुलांचे लग्नाचे वय हे २१ वर्षे असून ते त्याच्यासाठी योग्य असते. त्यालाही बाबा होण्यासाठी २२ ते ३५ वय वर्षांपर्यंत उत्कृष्ट असते. त्यानंतर होणाऱ्या मुलांना अपंगत्वाचा धोका निर्माण होतो. ते पालकांसाठी योग्य नसते व परवडणारे नसते.

वय वाढले तर?

शिक्षण, करिअर इतर व कोणत्याही कारणाने लग्न उशिरा होऊन आई-वडील होण्याचेही स्वप्नही उशिरा झालेच तर याचा मोठा फटका बसतो. त्यांना सिझरिंग, रक्तस्राव, अनुवंशिक रोगाचा सामना, बाळाला अपंगत्व, बाळ मतिमंद होण्याचा धोका, ब्लड प्रेशर वाढणे, साखर वाढणे, बाळ पोटात दगावणे, गर्भपात होणे, जन्माला येणाऱ्या मुलाचे वय कमी असणे यासह तिच्या मानसिक, शारीरिक घटकांवर परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. याचबरोबर संबंधित मुलांना देखील अशा प्रकारच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

डॉक्टर काय म्हणतात?

मुला-मुलींनी योग्य वयातच लग्न करावे. अन्यथा अनेक समस्यांना भविष्यात सामोरे जावे लागते. लग्न उशिरा होऊन मुलांना उशिरा जन्म दिल्यास त्याचा फटका हा दोघांनाही बसतो. सर्व बाबी उशिराने झाल्यास त्या मुलांनाही अनेक समस्यांचा सामना कायम करावा लागतो. -डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, मेडिसिन विभागप्रमुख, अंबाजोगाई.

मुलींचे लग्न उशिराने होऊन बाळही उशिरा झाले तर तिला रक्तस्राव, रक्तदाब, सिझर, बाळाला अपंगत्व अशा अनेक गोष्टींचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मुला-मुलींचे लग्न हे योग्य वयातच होणारे आवश्यक आहे. -डॉ. ज्योती डावळे, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, अंबाजोगाई.

 

Web Title: What is the right age to be a parent ?, the doctor said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.