९०% लोकांना माहीत नाही दही खाण्याची योग्य पद्धत; करतात 'या' चुका, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 01:55 PM2024-06-18T13:55:53+5:302024-06-18T14:06:56+5:30

दही चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास अनेक समस्या निर्माण होतात.

what is the right way to consume curd know from the expert curd benefits | ९०% लोकांना माहीत नाही दही खाण्याची योग्य पद्धत; करतात 'या' चुका, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

९०% लोकांना माहीत नाही दही खाण्याची योग्य पद्धत; करतात 'या' चुका, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

दही हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. याच्या सेवनाने शरीराला अनेक प्रकारे फायदा होतात, परंतु काही लोकांना दही खाल्ल्यानंतर अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. दह्याचे सेवन केल्याने काहींना सायनस, ताप, घसा दुखणं, त्वचेच्या समस्या, अपचन, ॲसिडीटी आणि केस गळणे असा त्रास होऊ शकतो. आता प्रश्न असा पडतो की दही हे आरोग्यदायी चांगलं आहे पण तरीही त्याचं सेवन केल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. याचं कारण म्हणजे दही चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास अनेक समस्या निर्माण होतात.

आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचे तज्ज्ञ डॉ. सलीम जैदी यांनी सांगितलं की, दही आरोग्यासाठी फायदेशीर आहे पण ९०टक्के लोक चुकीच्या पद्धतीने सेवन करतात. दही खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्रास वाढतो. दही योग्य वेळी आणि योग्य प्रकारे सेवन केल्यास कोणतीही समस्या उद्भवणार नाही. दही खाण्याची योग्य पद्धत कोणती आणि खाताना कोणत्या चुका करू नये हे जाणून घेऊया...

दही खाताना केल्या जातात 'या' चुका

आपण अनेकदा साखर किंवा मीठ घालून दही खातो. तुम्हाला माहीत आहे का दह्याची चव वाढवण्यासाठी वापरलेलं मीठ आणि साखरच तुमचं नुकसान करतं. मीठ आणि साखर यामुळे केमिकल प्रोसेस होते, ज्यांच्या सेवनामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. दह्यात साखर आणि मीठ टाकल्यास दह्यामध्ये असलेले गुड बॅक्टेरिया नष्ट होतात त्यामुळे दह्याचे पूर्ण फायदे मिळत नाहीत.

अशा प्रकारे खा दही

जर तुम्हाला दही गोड करायचं असेल तर तुम्ही त्यात मध टाकू शकता. दह्यात गूळही घालू शकता. जर तुम्हाला दह्यामध्ये मीठ टाकायचं असेल तर तुम्ही त्यात काळं मीठ टाकून सेवन करू शकता. जर तुम्ही रात्री दही खाल्लं केले तर ते तुमच्या आरोग्याचं नुकसानच करतं. आयुर्वेदानुसार, सूर्यास्तानंतर शरीराचं तापमान कमी होऊ लागतं आणि कफ दोष वाढू लागतो. रात्री दही खाल्ल्यास कफची समस्या होऊ शकते.

'या' गोष्टींसोबत खाऊ नका दही

- दह्यासोबत तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढते, त्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होतं. 
- काकडी आणि बुंदीसोबत दही खाऊ नका. त्याचे शरीरावर साइड इफेक्ट होतात. 
- दह्यासोबत कधीही केळी खाऊ नका. 
- आंबट फळांसोबत दही खाऊ नका, यामुळे आरोग्याला हानी पोहोचते.

Web Title: what is the right way to consume curd know from the expert curd benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.