जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम? वाचाल तर सोडाल 'ही' सवय...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 02:35 PM2024-09-10T14:35:29+5:302024-09-10T14:37:01+5:30
Oversleeping Side Effect : जास्त वेळ झोपण्याचे काय वाईट परिणाम होतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून अनेक गंभीर समस्यांपासून तुमचा बचाव होईल.
Oversleeping Side Effect : सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून 7 ते 8 तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची असते. यापेक्षा कमी झोप घेतल्याने आरोग्य बिघडू शकतं. पण बरेच लोक यापेक्षा जास्त वेळ झोपतात. पण असं करणं त्यांच्यासाठी खूप जास्त घातक ठरू शकतं. जास्त वेळ झोपण्याचे काय वाईट परिणाम होतात तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून अनेक गंभीर समस्यांपासून तुमचा बचाव होईल.
सतत डोकेदुखी
आपल्या शरीरात तयार होणारे सेरोटोनिन हार्मोन्स आपल्या झोपण्याच्या आणि जागण्याच्या पॅटर्नला कंट्रोल करतात. जर तुम्ही खूप जास्त झोपत असाल तर, सेरोटोनिनवर याचा निगेटिव्ह इफेक्ट पडतो. याने न्यूरोट्रान्समीटर बाधित होतात. ज्यामुळे डोकेदुखीची समस्या होऊ शकते. तेच तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर तुम्हाला अचानक जास्त भूक आणि तहान लागू शकते. याने डोकेदुखी होऊ लागते.
नियमितपणे पाठदुखी
जर तुम्हाला उशीरापर्यंत झोपण्याची सवय असेल तर तुम्हाला नेहमीच पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. मॅट्रेसची खराब क्वालिटीही याचं कारण असू शकते. अशात तर तुम्ही मॅट्रेसवर जास्त उशीरापर्यंत झोपत असाल तर याने मांसपेशींवर दबाव पडतो आणि अशाप्रकारे जास्त काळासाठी पाठदुखीचा त्रास होत राहतो.
डिप्रेशन-तणाव
उशीरापर्यंत झोपणं डिप्रेशनचं एक लक्षण असू शकतं. जर तुम्ही उशीरापर्यंत झोपत असाल तर याने तुमचं डिप्रेशन आणखी वाढत जाणार. स्लीपिंग सायकल बिघडत असल्याने तुम्हाला सतत तणाव आणि मानसिक दबाव जाणवतो. याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव पडतो.
सतत थकवा
उशीरापर्यंत झोप घेत असल्याने फ्रेश वाटण्याऐवजी थकवा जास्त जाणवतो आणि जास्त वेळ झोपेतूनही तुम्हाला दिवसभर झोप येत राहते. हा जास्त झोपण्याचा एक साइड इफेक्ट आहे. बॉडी क्लॉक बिघडल्याने असं होत असतं. जास्त आरामामुळे मांसपेशी आकुंचन पावतात. याने थकवा जाणवतो.
डायबिटीस
जास्त वेळ झोपल्याने हार्मोन्सचं संतुलन शरीरात बिघडतं. इन्सुलिनला कंट्रोल करणारे हार्मोन्स याने जास्त प्रभावित होतात. थकवा जाणवत असल्याने शरीरात एनर्जीची कमतरता जाणवते आणि मग तुम्ही जंक फूड किंवा जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाऊ लागता. याने ब्लड शुगर लेव्हलही वाढते.