सुपरड्रिंक जे उन्हाळ्यात जास्त पिण्याचा सल्ला देतात एक्सपर्ट, तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 04:30 PM2024-05-28T16:30:07+5:302024-05-28T16:30:57+5:30

डायटीशियन डॉ. भावेश गुप्ता यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं की, उन्हाळ्यात सुपरड्रिंक कोणतं ठरू शकतं.

What is the summers super drink according to Dietician Doctor Bhawesh Gupta | सुपरड्रिंक जे उन्हाळ्यात जास्त पिण्याचा सल्ला देतात एक्सपर्ट, तुम्हाला माहितीये का?

सुपरड्रिंक जे उन्हाळ्यात जास्त पिण्याचा सल्ला देतात एक्सपर्ट, तुम्हाला माहितीये का?

Healthy Drinks: दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. उष्णतेमुळे, घामामुळे आणि उन्हाच्या चटक्यांमुळे लोक हैराण झाले आहेत. जास्त तापमानामुळे लोकांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही होत आहेत. अशात एक्सपर्ट या दिवसांमध्ये भरपूर पाणी पिण्याचा आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला देतात. शरीर हायड्रेट ठेवणाऱ्या पेयांचं आणि आहार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. अशात डायटीशियन डॉ. भावेश गुप्ता यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं की, उन्हाळ्यात सुपरड्रिंक कोणतं ठरू शकतं. ज्यामुळे शरीराचं तापमान योग्य राहतं आणि आरोग्यही चांगलं राहतं.

डॉ. भावेश यांनी सांगितलं की, नारळाचं पाणी एक चांगलं सुपरड्रिंक आणि समरड्रिंक ठरू शकतं. या दिवसांमध्ये नारळ पाण्याचं नियमित सेवन केल्याने शरीरात हायड्रेशन कायम राहतं. म्हणजे नारळ पाण्यामुळे शरीरातील कमी झालेल्या पाण्याची कमतरता भरून निघते. नारळ पाणी तुम्ही एक्सरसाइजनंतरही पिऊन शकता. एक्सरसाइज करताना किंवा उन्हाळ्यात उष्णतेमुळे येणाऱ्या घामाच्या माध्यमातून शरीरातून इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात. ते परत मिळवण्यासाठी नारळ पाणी मदत करतं. 

डॉ. भावेश यांच्यानुसार, नारळ पाण्याशिवाय उन्हाळ्यात मोसंबीचा ज्यूस, संत्र्याचा ज्यूस किंवा ओआरएसचं सेवन करावं. याने शरीरात इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा तयार होतात. 

नारळ पाणी पिण्याचे फायदे

ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं

ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी रोज नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. असं मानलं जातं की ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यात नारळ पाण्याचं मोठं योगदान असतं. म्हणजे हे पाणी ब्लड प्रेशर नॉर्मल करण्यास मदत करतं. ज्याने तुम्हाला हार्टसंबंधी समस्या होत नाहीत किंवा टाळता येतील.

इम्यूनिटी होईल मजबूत

नारळ पाणी प्यायल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. एका नारळ पाण्यात साधारण 600 मिलिग्रॅम पोटॅशिअम असतात. ज्यामुळे आपली इम्यूनिटी मजबूत होते आणि अनेक आजारांसोबत लढण्याची आपल्याला शक्ती मिळते.

उलटी येण्यावरही फायदेशीर

उलटी आणि जुलाबाची समस्या असेल तर नारळ पाणी फार फायदेशीर ठरतं. अशात जर तुम्ही नारळ पाणी पिलात तर तुम्हाला याचे अनेक फायदे होतील. नारळ पाणी प्यायल्याने उलटी, जुलाब, पोटात जळजळ, आतड्यांवरील सूज आणि अल्सरची समस्या दूर करण्यास मदत मिळते.

किडनी राहते निरोगी

नारळ पाण्यामध्ये पोटॅशिअम अधिक राहत असल्याने किडनीलाही अनेक फायदे मिळतात. नारळ पाण्याचं नियमित सेवन केल्याने किडनीचे कार्य अधिक चांगल्या पद्धतीने होतात.

त्वचा आणि केसांना फायदा

त्वचा आणि केसांना नारळ पाण्याने भरपूर फायदा मिळतो. नारळ पाण्याने त्वचेचं टेक्स्चर अधिक चांगलं होतं आणि त्वचा चमकदार व ताजी दिसते. रोज नारळ पाणी प्यायल्याने त्वचा आणि केसांना आतून भरपूर पोषण मिळतं.

Web Title: What is the summers super drink according to Dietician Doctor Bhawesh Gupta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.