ट्रिकोटिलोमेनिया काय आहे?; तुम्हीही डोक्यावरचे केस ओढत असाल तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 05:31 AM2022-07-03T05:31:26+5:302022-07-03T05:31:41+5:30

ट्रिकोटिलोमेनिया मुले आणि किशोरवयीनांमध्ये सामान्य आहे. लहान मुलांत हे आपोआप दूर होते.

What is trichotillomania ?; If you are also pulling hair on your head then know the reason | ट्रिकोटिलोमेनिया काय आहे?; तुम्हीही डोक्यावरचे केस ओढत असाल तर...

ट्रिकोटिलोमेनिया काय आहे?; तुम्हीही डोक्यावरचे केस ओढत असाल तर...

googlenewsNext

डॉ. जय देशमुख, एमडी, एफसीपीएस,एमएनएएमएस

ट्रिकोटिलोमेनिया किंवा टीटीएम एक मनोवैज्ञानिक समस्या आहे. यात व्यक्ती नाइलाजाने आपलेच केस ओढतो किंवा उपटतो. ही समस्या ओबसेस्सिव्ह कंपलसिव्ह डिसऑर्डरअंतर्गत येते. हा आजार गंभीर झाल्यास व्यक्तीच्या व्यक्तित्व, जीवनाची गुणवत्ता आणि आनंदावर त्याचा मोठा प्रभाव पडतो.

हा कोणाला प्रभावित करतो
ट्रिकोटिलोमेनिया मुले आणि किशोरवयीनांमध्ये सामान्य आहे. लहान मुलांत हे आपोआप दूर होते. त्याचे गंभीर रूप १० ते १३ या वयोगटात प्रकट होते. वयस्कर व्यक्तीमध्ये हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक आढळले आहे.

ट्रिकोटिलोमेनियापासून प्रभावित व्यक्ती कोणापासून पीडित होतात?
आपल्या स्वत:च्या केसांना ओढल्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते, म्हणजे ओढल्याच्या ठिकाणी त्वचेत जळजळ, संक्रमण आणि हातांना इजा होते. टीटीएमच्या काही व्यक्ती आपल्या केसांना गिळून टाकतात आणि त्यांना ट्रायकोबेजॉर होण्याचा धोका म्हणजे पोटात हेअर बॉल्स होतात. नंतर मुलांना चिंता विकार, मनोदशा विकार, खाण्याचे विकार आणि व्यक्तित्व विकार होऊ शकतो.

दैनिक कामकाज कसे प्रभावित होते?
हे शाळेतील उपस्थिती, सामाजिक कामकाजाला खराब करू शकते. अनेक मुले आणि युवक त्यांचे मित्र त्यांच्या टकलेपणाचा शोध लावतील हा विचार करून घाबरतात. केस ओढल्यामुळे कौटुंबिक जीवन प्रभावित होऊ शकते. कौटुंबिक वादाला वाढवू शकते. त्यामुळे तणाव वाढू शकतो. हे केस ओढण्याच्या आजाराला आणखी वाढवू शकते. टीटीएम असलेल्या व्यक्तीमध्ये केस ओढण्याची प्रबळ इच्छा होते. काही व्यक्ती आपले केस मुळापासून ओढतात, काही दाढी, पापण्या किंवा भुवयांचे केसही काढतात. काही व्यक्ती आपण ओढलेले केस खाऊन टाकतात. याला ट्रायकोफॅगिया नावाने ओळखण्यात येते. यामुळे गॅस्ट्रोइन टेस्टीनल ट्रेक्टच्या समस्या होतात.

काय आहेत मुख्य लक्षण? 
व्यक्ती आपले स्वत:चे केस ओढतो; पण त्याला त्याची जाणीव होत नाही. केस तुटल्यानंतर त्याला समाधान वाटते. वारंवार स्वत:ला थांबविण्याचा प्रयत्न सुरू असतो; पण तरीही केसांना ओढतो. आपल्या केसांमुळे तो नेहमी तणावात राहतो. अशा व्यक्तीच्या डोक्याच्या काही भागात  बघितल्यावर त्यात टक्कल पडल्याचे दिसून येते. 

जोखीम घेण्यासारखे काय आहे?
काही लोकांना नकारात्मक भावनांचा त्रास होत असल्याने ते आपले केसं ओढतात. काहींमध्ये कौटुंबिक अनुवांशिकता हे देखील एक कारण होऊ शकते.  ट्रिकोटिलोमेनियासाठी बालपणीचा अपघातही जबाबदार असू शकतो. 

उपचार काय आहे?
बरेच लोकं याचा उपचार करीत नाही. कारण ते याला एक सवय मानतात, आजार नाही. अन्य काही कारणे आहेत ज्यामुळे ते या आजाराचे निदान शोधत नाही. अशा स्थितीतील लोकांसाठी व्यवहार चिकित्सा व औषधी गुणकारी ठरू शकते. 

व्यवहार चिकित्सा काय आहे?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हैबिट रिवर्सल थेरेपी ही व्यावहारिक चिकित्सेचा एक भाग आहे. ट्रिकोटिलोमेनियाच्या उपचारामध्ये ती प्रभावी ठरू शकते. यात जागरुकता प्रशिक्षण, प्रतिस्पर्धी प्रतिक्रिया प्रशिक्षण, प्रेरणा व अनुपालन, विश्राम प्रशिक्षण व सामान्यीकरण प्रशिक्षणाचा समावेश आहे. 

कुठल्या औषधी उपयोगी?
या आजाराच्या उपचारावर फार कमी परीक्षण झाले आहे. वर्तमानात ट्रायकोटिलोमेनिया यावर महत्त्वपूर्ण उपचार व प्रभावी औषधाच्या रूपात ओलानजापाईन, एन-एसिटाईलसिस्टीन व क्लोमीप्रामाईन यांचा समावेश आहे. 

अडचण काय आहे?
सदैव तणावात असणारे व आपला तणाव प्रदर्शित न करू शकणारे ट्रिकोटिलोमेनियाचे २० टक्के रुग्ण आपल्या केसांना खातात. याला ट्राईकोफैगिया असेही म्हटल्या जाते. ट्राइकोबेजोअर्स मध्ये उल्टी, मळमळ, पोटात दुखणे व आतड्यांमध्ये अवरोध व ॲनिमियाचा समावेश आहे. काही प्रकरणात त्यांना हेअर बॉलला काढण्यासाठी सर्जरीची आवश्यकता भासू शकते.    
 

Web Title: What is trichotillomania ?; If you are also pulling hair on your head then know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.