वेगन इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? त्यामुळे वजन कमी होतं का? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 02:40 PM2022-08-05T14:40:24+5:302022-08-05T14:42:25+5:30

आता फिटनेस फ्रिक असलेले लोक व्हेगन आहार घेऊनही इंटरमिटंट फास्टिंग करत आहेत. या प्रकारचा आहार खरं तर शरीराला अनेक फायदे देऊ शकतो. चला जाणून घेऊया व्हेगन इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय आणि त्याचे आरोग्य फायदे काय आहेत.

what is vegan intermittent fasting how is it helpful | वेगन इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? त्यामुळे वजन कमी होतं का? जाणून घ्या सविस्तर

वेगन इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? त्यामुळे वजन कमी होतं का? जाणून घ्या सविस्तर

googlenewsNext

16 तास उपवास आणि 8 तास खाणे ही पद्धत सध्या वजन कमी करण्याचा ट्रेंड बनली आहे. यालाच इंटरमिटंट फास्टिंग म्हणतात. इंटरमिटंट फास्टिंग केल्याने केवळ वजनच कमी होत नाही तर बीपी आणि शुगर सारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. इंटरमिटंट फास्टिंग करण्याप्रमाणे, लोक व्हेगन अन्नाकडे आकर्षित होत आहेत. यामध्ये दूध, दही, चीज, अंडी यासारख्या उत्पादनांचा समावेश होत नाही. हा पूर्णपणे वनस्पती आधारित आहार आहे. आता फिटनेस फ्रिक असलेले लोक व्हेगन आहार घेऊनही इंटरमिटंट फास्टिंग करत आहेत. या प्रकारचा आहार खरं तर शरीराला अनेक फायदे देऊ शकतो. चला जाणून घेऊया व्हेगन इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय आणि त्याचे आरोग्य फायदे काय आहेत.

व्हेगन इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय
हेल्थलाइननुसार, इंटरमिटंट फास्टिंग हा खाण्याचा असा एक प्रकार आहे, ज्यामध्ये खाणे आणि उपवासादरम्यान निश्चित कालावधी असतो. दोन तासांचज्या फास्टिंग सायकल असतात. ज्यामध्ये 16 तास आणि 24 तास म्हणजे एक दिवसाचा उपवास अधिक ट्रेंडमध्ये आहे. व्हेगन डाएट फॉलो करणारे लोकही ही फास्टिंग सायकल पाळू शकतात. मात्र या व्हेगन इंटरमिटंट फास्टिंगदरम्यान खाल्ले जाणारे अन्नपदार्थ पूर्णपणे वनस्पती आधारित असतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ वापरले जात नाहीत.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
व्हेगन इंटरमिटंट फास्टिंगमुळे ट्रायग्लिसराइड आणि कमी घनता असलेल्या लिपोप्रोटीन कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होऊ शकतो.

रक्तातील साखर नियंत्रित होते

  • व्हेगन इंटरमिटंट फास्टिंगमुले रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते आणि शरीराची इन्सुलिनची क्षमता वाढू शकते.
  • मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर
  • व्हेगन इंटरमिटंट फास्टिंगमुळे अल्झायमर रोग टाळता येतो. असे केल्याने मिर्गीची लक्षणेही कमी होऊ शकतात.
  • कर्करोगाचा धोका कमी होतो
  • व्हेगन इंटरमिटंट फास्टिंगमुळे डीएनएचे नुकसान होण्यापासून टळते. हे कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासदेखील मदत करू शकते. ते अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.
  • बॉलिवूड सेलिब्रिटी नाश्त्यात खातात चविष्ट पदार्थ, हेल्दी राहण्यासाठी तुम्हीही करा डाएटमध्ये सामील
  • व्हेगन इंटरमिटंट फास्टिंगचा पॅटर्न
  • 6/8 पद्धतीत 16 तास उपवास आणि 8 तास खाण्यासाठी असतात. यामध्ये नाश्ता सोडून 12 ते 8 आणि 1 ते 9 पर्यंत जेवण करता येते.
  • Eat-Stop-Eat द्वारे आठवड्यातून एक किंवा दोनदा उपवास केला जातो.
  • 5:2 आहारामध्ये, आठवड्यातून दोन दिवस फक्त 500 ते 600 कॅलरीज वापरल्या जातात आणि उर्वरित 5 दिवस सामान्य आहार घेता येतो.

Web Title: what is vegan intermittent fasting how is it helpful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.