फारच घातक आहे वेगाने वाढणारा हा आजार, वेळीच समजला नाही तर जाऊ शकतो जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 09:48 AM2024-04-12T09:48:46+5:302024-04-12T09:49:14+5:30

Viral Hepatitis : या आजाराने होणाऱ्या मृत्यूंची अंदाजे संख्या 2022 मध्ये 13 लाख झाली आहे. हीच संख्या 2019 मध्ये 11 लाख होती.

What is viral hepatitis, rise in global deaths know the symptoms | फारच घातक आहे वेगाने वाढणारा हा आजार, वेळीच समजला नाही तर जाऊ शकतो जीव!

फारच घातक आहे वेगाने वाढणारा हा आजार, वेळीच समजला नाही तर जाऊ शकतो जीव!

Viral Hepatitis : सध्या वेगवेगळे गंभीर आजार लोकांना शिकार बनवत आहेत. यातीलच एक गंभीर आजार म्हणजे Viral Hepatitis. हा आजार अलिकडे एक मोठी समस्या बनत चालला आहे.

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'डब्ल्यूएचओ 2024 ग्लोबल हेपेटायटिस रिपोर्ट'मध्ये सांगण्यात आलं की, या आजाराने होणाऱ्या मृत्यूंची अंदाजे संख्या 2022 मध्ये 13 लाख झाली आहे. हीच संख्या 2019 मध्ये 11 लाख होती. रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, हेपेटायटिस बी आणि सी इन्फेक्शनमुळे दररोज जगभरात 3,500 लोक जीव गमावत आहेत. 

हेपेटायटिसची लक्षण

सोप्या भाषेत सांगायचं तर ही लिव्हरसंबंधी एक समस्या आहे. ज्यात लिव्हरवर सूज येते. हेपेटायटिस ए, बी आणि सी वायरल इन्फेक्शनची मुख्य कारणे आहेत. डोळ्यांमध्ये पिवळेपणा, लघवीचा रंग बदलणे, जास्त थकवा, उलटी किंवा मळमळ, पोटदुखी, सूज, अचानक वजन कमी होणे आणि भूक न लागणे या लक्षणांचा यात समावेश आहे. ही लक्षण दिसली तर वेळीच डॉक्टरांना भेटा आणि योग्य उपचार घ्या

भारतात हेपेटायटिस

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एका शोधानुसार, भारतात या आजारामुळे लाखो लोकांचा जीव जात आहे. हा आजार रोखण्यासाठी 1982 पासून एक वॅक्सीन असूनही असं होतं. याने 95 टक्के आजार कमी केला जाऊ शकतो. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅंड प्रिवेंशन (CDC) नुसार हेपेटायटिसचे तीन डोज या आजारापासून वाचवू शकतात.

हेपेटायटिसपासून बचाव

हेपेटायटिस लिव्हरसंबंधी एक समस्या आहे. जर लिव्हल हेल्दी ठेवण्यासाठी हेल्दी डाएट फॉलो केली तर या आजाराचा धोका कमी केला जाऊ शकतो. एक्सपर्ट अल्कोहल, जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड न खाण्याचा सल्ला देतात. तसेच भरपूर पाणी पिण्यास सांगतात.

Web Title: What is viral hepatitis, rise in global deaths know the symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.