लहान मुलांनाच होतो जुवेनाइल डायबिटीस, जाणून घ्या कारणे आणि लक्षणे....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 09:47 AM2019-12-17T09:47:50+5:302019-12-17T09:52:46+5:30
या डायबिटीसला टाइप १ डायबिटीस असंही म्हणतात. हा डायबिटीस साधारण १८ वयोगटातील मुला-मुलींमध्ये आढळतो.
बॉलिवूड अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्या मुलीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. ती जुवेनाइल डायबिटीसने ग्रस्त होती. सामान्यपणे टाइप २ डायबिटीस आणि डायबिटीस एवढंच काय ते जास्तीत जास्त लोकांना माहीत असतं. पण जुवेनाइलबाबत अनेकांना फारशी माहितीच नसते. आज आम्ही तुम्हाला जुवेनाइल डायबिटीसबाबत सांगणार आहोत.
काय आहे जुवेनाइल डायबिटीस?
(Image Credit : frankeldiabeticfoundation.org)
या डायबिटीसला टाइप १ डायबिटीस असंही म्हणतात. हा डायबिटीस साधारण १८ वयोगटातील मुला-मुलींमध्ये आढळतो. ही एक गंभीर स्थिती असते ज्यात पेन्क्रियाज फार कमी प्रमाणात इन्सुलिन तयार करतं तर काही केसेसमध्ये तयारच करत नाही. इन्सुलिन एक हार्मोन आहे ज्याने शुगर पेशींमध्ये पोहोचून शरीराला ऊर्जा मिळते. पेन्क्रियाजच्या इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी जेव्हा काही कारणाने नष्ट होतात तेव्हा इन्सुलिन तयार होणं बंद होतं. याने ब्लडमध्ये शुगरचं प्रमाण अनियंत्रित होऊ लागतं.
काय असतात लक्षणे?
टाइप -१ डायबिटीसची लक्षणे अनेकदा लहान मुलांमध्ये अचानक दिसून येतात. जसे की, जास्त तहान लागणे, पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागणे, रात्री झोपेत गादी भिजवणे, जास्त भूक लागणे, वेगाने वजन वाढणे. त्यासोबतच मुलांचा मूड सतत बदलणे आणि डोळ्यांसमोर धुसर दिसणे अशी लक्षणे बघायला मिळतात.
काय असतं कारण?
(Image Credit : medlineplus.gov)
या आजाराचं कारण आतापर्यंत तरी समोर आलेलं नाहीये. हा एक प्रकारचा ऑटो-इम्यून डिजीज आहे. सामान्यपणे शरीराचं इम्यून सिस्टीम बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट करतात. पण ऑटो-इम्यून डिजीजच्या स्थितीत हीच सिस्टीम पेन्क्रियाजच्या इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी नष्ट करते. याचं कारण आनुवांशिकता किंवा व्हायरसही असू शकतं. हा आजार साधारणपणे ४ ते ७ किंवा १० ते १४ वर्षांच्या मुला-मुलींमध्ये आढळतो.
काय घ्यावी काळजी?
- पालकांनी लहान मुलांच्या औषधांवर आणि खाण्या-पिण्यावर लक्ष द्यावं.
- वेळोवेळी ब्लड टेसट आणि बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- लहान मुलांना कोल्ड ड्रिंक्स, जंक फूड, भात, मिठाई, बटाट्यासारखे पदार्थ देऊ नये.
- जास्त वेळ त्यांना उपाशी राहू देऊ नका. डॉक्टरच्या सल्ल्याने डाएट प्लॅन तयार करा.
- त्यांना फिजिकल अॅक्टिविटीसाठी प्रेरित करा.