कडक उन्हातून घरी आल्यावर लगेच काय करू नये आणि काय करावे?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 09:50 AM2024-05-03T09:50:50+5:302024-05-03T09:51:29+5:30
उन्हातून घरी आल्यावर लगेच काही गोष्टी केल्या तर आरोग्यासाठी हे फारच घातक ठरू शकतं. अशात याबाबत आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत.
Healthy Tips: उन्हाचा पारा आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उष्णता आणि घामामुळे अंगाची लाही लाही होत आहे. अशात आरोग्याचं नुकसान तर होतंच सोबतच त्वचेचं नुकसानही होतं. कितीही टाळायचं म्हटलं तरी लोकांना काहीना काही कारणाने उन्हात बाहेर जावंच लागतं. पण समस्या तेव्हा जास्त होते जेव्हा उन्हातून घरी आल्यावर तुम्ही काही गोष्टी करता ज्या टाळायला हव्यात. उन्हातून घरी आल्यावर लगेच काही गोष्टी केल्या तर आरोग्यासाठी हे फारच घातक ठरू शकतं. अशात याबाबत आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत.
उन्हातून आल्यावर करू नये ही कामे
घरात येताच एसी किंवा कुलरची हवा घेणे
बाहेरून जेव्हा तुम्ही घरी येता आणि थेट एसी किंवा कुलरची थंड हवा घेता तेव्हा उष्ण आणि थंड यांचं मिश्रण होत असल्याने तब्येत बिघडू शकते. तुम्हाला उन्ह लागण्याची शक्यता असते. जोपर्यंत घाम सुकत नाही आणि शरीराचं तापमान कमी होत नाही तोपर्यंत एसी किंवा कुलरमध्ये जाऊ नका.
उन्हातून आल्या आल्या आंघोळ
उन्हात जास्त वेळ राहिल्याने शरीराचं तापमान जास्त वाढतं. अशात घरी आल्यावर लगेच थंड पाण्याने आंघोळ कराल तर तुम्हाला उष्माघात होऊ शकतो. मांसपेशींमध्ये आखडलेपणा येऊ शकतो. त्यामुळे उन्हातून आल्यावर थोडावेळ शांत बसा, तापमान कमी होऊ द्या मगच आंघोळ करा.
गटागटा थंड पाणी पिणे
शरीराचं तापमान वाढलेलं असेल आणि वरून थंड पाणी प्याल तर सगळ्यात आधी तर तुमचा घसा खराब होतो. तुम्हाला उन्ह लागू शकतं आणि अनेकदा तर व्यक्तीला तापही येतो. अशात उन्हातून घरी आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये. प्यायचं असेल तर दोन घोट नॉर्मल पाणी प्यावे.
थंड जेवण करणे
जसे की वर सांगितलं की, उन्हातून घरी आल्यावर थंड पाणी पिऊ नये तसंच बाहेरून आल्यावर लगेच काही थंड खाऊ सुद्धा नये. आधी काही वेळ आराम करा, शरीराचं तापमान सामान्य होऊ द्या आणि त्यानंतर काही खावे.
लगेच झोपू नये
बरेचजण उन्हातून घरी आल्यावर लगेच झोपतात. पण काहीच खाल्लं किंवा प्यायले नाही तर शरीरातं पाण्याची कमी होते. घाम गेल्याने पाणी कमी होतं. ज्यामुळे उन्ह लागू शकतं. तसेच तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकतं. त्यामुळे घरी आल्यावर काही वेळ शांत बसा आणि नंतर एखादं सरबत किंवा लिंबू पाणी प्यावे.