जाणून घ्या काय आहे पॉवर योगा आणि काय होतात याचे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 10:11 AM2019-06-03T10:11:31+5:302019-06-03T10:22:03+5:30

सध्या अनेकांच्या लाइफस्टाइलमध्ये योगाभ्याला महत्त्वाचं स्थान आहे. योगाचे आरोग्यासाठीचे फायदे आता लोकांना पटू लागले आहेत.

What is power yoga and how it is beneficial for health | जाणून घ्या काय आहे पॉवर योगा आणि काय होतात याचे फायदे!

जाणून घ्या काय आहे पॉवर योगा आणि काय होतात याचे फायदे!

googlenewsNext

(Image Credit : Om Yoga Casablanca)

सध्या अनेकांच्या लाइफस्टाइलमध्ये योगाभ्याला महत्त्वाचं स्थान आहे. योगाचे आरोग्यासाठीचे फायदे आता लोकांना पटू लागले आहेत. त्यामुळे योगा करण्यावर अनेकांचा भर बघायला मिळतोय. तुम्हालाबी योगाभ्यासाचे वेगवेगळे प्रकार माहीत असतील. पण सध्या एका वेगळ्याच संपल्पनेची चर्चा सुरू आहे. ती म्हणजे पॉवर योगा. असे सांगितले जाते की, पॉवर योगाच्या माध्यमातून शरीर निरोगी ठेवलं जातं.

(Image Credit : yogaposesasana.com)

सूर्य नमस्कार आणि काही इतर आसने एकत्र करून पॉवर योग ही संकल्पना तयार करण्यात आली आहे.  यात दोन गुण असतात. हा योगाभ्यास अष्टांग योगाभ्यासाप्रमाणे केला जातो. हा योगाभ्यास जर तुम्ही सकाळच्या वेळी कराल तर याचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. हा योगाभ्यास आठवड्यातून २ ते ३ वेळा ४५ मिनिटांसाठी करू शकता. या योगाभ्यासाने आरोग्याला अनेक फायदे होतात, सोबतच शरीरावरील अतिरिक्त चरबी देखील कमी होते. 

काय आहेत याचे फायदे

(Image Credit : Residence Domaso)

पॉवर योगाची सुरूवात १९९० मध्ये करण्यात आली. याचा शोध श्री पट्टाभि जॉइस यांच्यासोबत अभ्यास करणाऱ्या दोन अमेरिकन योग शिक्षकांनी केला होता. त्यांनीच या योगाभ्यास पाश्चिमात्य विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध केला. या योगाभ्यासामध्ये घाम भरपूर येतो. घामामध्ये टॉक्सिनचं प्रमाण अधिक असतं. अशात घामामुळे टॉक्सिन शरीरातून बाहेर येतं. 

आजारांपासून सुटका

(Image Credit : Health Fitness India)

पॉवर योगा केल्याने शरीरात रक्तप्रवाह योग्यरितीने होण्यास मदत मिळते. त्यामुळे शरीराचा अनेक रोगांपासून बचाव होतो. अस्थमा, अर्थरायटिस, डिप्रेशन, डायबिटीस आणि हायपरटेंशसारख्या आजारांपासूनही या योगाभ्यासाने बचाव केला जाऊ शकतो. तसेच याने मानसिक लाभही होतात.

वजन कमी करतो

(Image Credit : balanceblog.bistromd.com)

हा योगाभ्यास केल्याने मसल्स मजबूत होतात, सोबतच शरीरातील चरबी सुद्धा कमी होते. अनेक योगाभ्यासांमध्ये आसन आणि श्वासाच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रीत केलं जातं. पण पॉवर योगात केल्या जाणाऱ्या क्रियांवर लक्ष केंद्रीत केलं जातं. पॉवर योगाने शरीरातील कॅलरी कमी करण्यास मदत मिळते.

Web Title: What is power yoga and how it is beneficial for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.