Coronavirus : मशीन छोटं, काम मोठं... कोरोना काळात पल्स ऑक्सीमीटरही घरच्या मेडिकल बॉक्समध्ये असायला हवं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 12:02 PM2020-06-20T12:02:31+5:302020-06-20T12:31:40+5:30

अमेरिकन डॉक्टर रिचर्ड लेविटन यांच्यानुसार, जर लोक pulse oximeter च्या मदतीने समजू शकले की, केव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर हॉस्पिटलवर दबाव कमी राहील.  

What Is A Pulse Oximeter And How Does It Help In Coronavirus Detection? | Coronavirus : मशीन छोटं, काम मोठं... कोरोना काळात पल्स ऑक्सीमीटरही घरच्या मेडिकल बॉक्समध्ये असायला हवं?

Coronavirus : मशीन छोटं, काम मोठं... कोरोना काळात पल्स ऑक्सीमीटरही घरच्या मेडिकल बॉक्समध्ये असायला हवं?

Next

कोरोनाबाबत माहिती मिळवण्यात बिझी असलेल्या अनेक एक्सपर्ट्सनी सांगतात की, रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण सांगणाऱ्या डिवाइसनेही कोरोनाचा स्तर जाणून घेता येऊ शकतो. एका माचिसच्या आकाराचं हे डिवाइस केवळ बोटावर किंवा कानावर क्लिप करायचं आहे. याने ना केवळ हार्ट तर फुप्फुसांची स्थितीही माहिती पडते.

डेली मेलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टमध्ये National Institute for Health and Care Excellence (Nice) चे माजी सल्लागार डॉ. निक सर्मटन सांगतात की, जर ऑक्सिजन सॅच्युरेशन एका निश्चित स्तरापेक्षा 2 ते 3 टक्के खाली पडला तर स्थिती गंभीर आहे. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरात सामान्य स्थितीत ऑक्सिजन सॅच्युरेशन 95 ते 100 इतकं असतं. तसेच याने पल्स रेटही समजतो.

घरीच होऊ शकेल टेस्ट

काही तज्ज्ञांचं मत आहे की, जर लोक घरीच कोरोना व्हायरसचा स्तर तपासू शकले तर फायदाच आहे. जसे अमेरिकन डॉक्टर रिचर्ड लेविटन यांच्यानुसार, जर लोक pulse oximeter च्या मदतीने समजू शकले की, केव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर हॉस्पिटलवर दबाव कमी राहील.  

सोबतच याने असे रूग्णही ओळखले जाऊ शकतील ज्यांना खरंच आणि वेळीच व्हेंटिलेटरची गरज असते. न्यूयॉर्क टाइम्सला डॉक्टर लेविटन यांनी सांगितले की, याने लोक घरीच टेस्ट करू शकतील किंवा क्लिनिकमध्ये जाऊन टेस्ट करू शकतात. याने कळेल की, कोरोनामध्ये फुप्फुसं कसे काम करत आहेत.

काय आहेत सुरूवातीचे संकेत

कोरोना अधिक गंभीर होत आहे हे समजून घेण्यासाठी कोणतही वेगळं गणित करण्याची गरज नाही. फक्त काही सामान्य संकेतांवर लक्ष द्यावं लागतं. जसे की, यूकेचे पतंप्रधान बोरिस जॉन्सन हे कोरोना झाल्यावर घरीच उपाय घेत होते. यादरम्यान ते कामकाजही करत होते. पण त्यांची स्थिती बिघडण्याबाबत तेव्हा माहिती मिळाली जेव्हा टेस्टमध्ये त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन स्तर कमी दिसला. 

पल्स ऑक्सीमीटरच्या मदतीने हे बघता येतं. यात असलेल्या सेंसरने हे कळतं की, रक्तातील ऑक्सिजन प्रवाह कसा आहे. याचं रिडींग ऑक्सीमीटरच्या स्क्रीनवर दिसतं. स्क्रीनवर 95 ते 100 आसपासचे आकडे दिसत असतील तर ते सामान्य आहेत. तेच श्वासाशी संबंधित रूग्णांमध्ये ही संख्या फार कमी असू शकते.

आधीच मिळतो संकेत

पल्स ऑक्सीमीटर यामुळेही महत्वपूर्ण मानलं जातं कारण याच्या मदतीने एखादं लक्षण दिसण्याआधी कळून येतं की, कोरोना व्यक्तीच्या फुप्फुसावर काय प्रभाव करत आहे. श्वास भरून येणे किंवा ओठ-बोटे निळे पडणे फार नंतर सुरू होतं. त्याआधीच हा डिवाइस स्थिती सांगतो आणि रूग्ण वेळीच हॉस्पिटलमध्ये जाऊ शकेल. 

काही दोषही आहेत

या उपकरणाचे जसे काही फायदे आहेत, तसेच यात काही दोषही आहेत. जसे की, रूग्ण आराम करत असेल तर हा डिवाइस वॉर्निंग देत नाही. आणि मग रूग्णाला वाटतं की ते ठिक आहेत. कॅंब्रिज युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे प्राध्यापक Babak Javid सांगतात की, काही रूग्णांनी जर हलकी एक्सरसाइज केली किंवा जरा वेळ चालले तरी सुद्धा त्यांच्या शरीरात ऑक्सीजनची मागणी वाढते आणि फुप्फुसं मदत करू शकत नाहीत. अशात रक्तात ऑक्सीजनचं प्रमाण कमी झाल्याचं दिसतं.

अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स आणि यूकेसारख्या देशांमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रूग्ण आहेत. भारतातही आकडेवारी वाढली आहे. हॉस्पिटल्समध्ये बेड कमी पडत आहेत, त्यामुळे हलकी लक्षणे असलेल्या रूग्णांना औषध देऊन घरीच आयसोलेट केलं जात आहे. अशात पल्स ऑक्सीमीटर हे छोटसं डिवाइस फार फायदेशीर ठरू शकतं. या डिवाइसची किंमत 2 हजार रूपये आहेत. पण सध्याच्या स्थितीत घरात वयोवृद्ध किंवा आजारी लोक असतील तर हे फायदेशीर ठरू शकतं.

चिंताजनक! कोरोना व्हायरसची झाली होती लागण, पण 'इतक्या' लोकांमध्ये आढळल्याच नाहीत काही अ‍ॅंटीबॉडीज!

Coronavirus: चिंताजनक! सर्दी, खोकल्यासोबतच कोरोना विषाणूचा प्रसार होणारं ‘हे’ नवीन लक्षण उघड!

Web Title: What Is A Pulse Oximeter And How Does It Help In Coronavirus Detection?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.