वजन कमी करण्यासाठी 'ही' आहे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 01:13 PM2019-05-21T13:13:22+5:302019-05-21T13:16:52+5:30

आरोग्य जपण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी योग्वेळी हेल्दी पदार्थांचं सेवन करणं अत्यंत आवश्यक असतं. खासकरून ज्या व्यक्ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा त्यासाठी डाएट फॉलो करत असतील त्यांनी या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक ठरतं.

What is the right lunchtime for weight loss | वजन कमी करण्यासाठी 'ही' आहे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ; जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी 'ही' आहे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ; जाणून घ्या

Next

(Image Credit : Healthfully)

आरोग्य जपण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी योग्वेळी हेल्दी पदार्थांचं सेवन करणं अत्यंत आवश्यक असतं. खासकरून ज्या व्यक्ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा त्यासाठी डाएट फॉलो करत असतील त्यांनी या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक ठरतं. जर तुम्ही कमी वेळात जास्त वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला खाण्यासोबतच खाण्याची योग्य वेळही माहीत असणं गरजेचं आहे. परंतु, कामाचं प्रेशर आणि वेळ न मिळाल्यामुळे जास्तीत जास्त लोक लंच म्हणजेच दुपारचं जेवण उशीरा करतात आणि त्यांची हिच सवय त्यांचं वजन वाढवण्यासाठी कारण ठरते. 

दुपारी जेवण करण्याची सर्वात खराब वेळ काय आहे?

अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, दुपारचं जेवण 3 वाजल्यानंतर जेवणाऱ्या लोकांमध्ये वजन कमी होण्याची प्रक्रिया कमी होते. हे संशोधन स्पेनमधील जवळपास 1200 पेक्षा जास्त अधिक वजन असणाऱ्या लोकांवर करण्यात आलं आहे. संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्ती वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत होत्या. संशोधनादरम्यान असं आढळून आलं की, जे लोक 3 वाजल्यानंतर दुपारचं जेवण करतात. त्यांच वजन लगेच कमी होत नाही तर वाढतं. 

या संशोधनातून खासकरून विशेष जेनेटिक असणाऱ्या लोकांना सहभागी करण्यात आले होते. तसेच 2013मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनाच्या अहवालामध्ये ही गोष्ट समोर आली होती की, दुपारी 3 वाजल्यानंतर जेवण करणाऱ्या लोकांचं वजन लगेच कमी होत नाही. 

दुपारच्या जेवणाच्या वेळेमुळे काय फरक पडतो?

इंटरनल क्लॉक सर्केडियन रिदम शरीराच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या क्रियेवर नियंत्रण ठेवते. इन्सुलिन हार्मोन्सवरही याचा परिणाम होतो. तसेच जेव्हा शरीरामध्ये इन्सुलिन सेन्सिटिविटी लो होते, त्यावेळी वजन कमी करणं अवघड होतं. 

जेवण जेवण्याची योग्य वेळ काय आहे?

हार्वर्ड यूनिवर्सिटी द्वारे करण्यात आलेल्या संशोधनानुसार, कधीही जवल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होतात. ज्या व्यक्ती योग्य वेळी जेवत नाहीत, त्यांना वजन कमी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दररोज एका ठरलेल्या वेळी जेवण जेवल्याने शरीराची सर्केडिअन क्लॉक योग्य पद्धतीने काम करते. 

संशोधनामध्ये सांगण्यात आले आहे की, योग्य वेळी जेवल्याने मेटाबॉलिज्म, लठ्ठपणा आणि स्लिप सायकल योग्य पद्धतीने काम करतं. तुम्हीही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर योग्य वेळी सुरुवात करा. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही त्या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: What is the right lunchtime for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.