सीरो पॉझिटिव्हिटी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढणं म्हणजे नक्की काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 11:45 AM2020-08-20T11:45:12+5:302020-08-20T12:14:37+5:30

आज आम्ही तुम्हाला सिरो पॉझिटिव्हिटी आणि इम्युनिटी यातील फरक सांगणार आहोत. 

What is seropositivity and how it is different from immunity or immune cells | सीरो पॉझिटिव्हिटी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढणं म्हणजे नक्की काय? जाणून घ्या

सीरो पॉझिटिव्हिटी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढणं म्हणजे नक्की काय? जाणून घ्या

googlenewsNext

गेल्या २४ तासांमध्ये देशात कोरोना व्हायरसचे नवीन रुग्ण मोठ्या संख्येनं  दिसून आले आहेत. या संक्रमणामुळे मृत्यू होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.  सध्या सीरो पॉझिटिव्हिटी आणि इम्यूनिटीबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. आज आम्ही तुम्हाला सिरो पॉझिटिव्हिटी आणि इम्युनिटी यातील फरक सांगणार आहोत. 

सीरो पॉझिटिव्हिट किंवा सीरो इम्यूनिटी एकाच क्रियेची दोन नावं आहेत. साधारणपणे शरीरातील रक्तात अन्य पदार्थही प्रवाहित होत असतात. या तरल पदार्थांना फ्लूईड सीरम म्हणतात. सीरो इम्युनिटीची चाचणी करण्यासाठी रक्ततील हे फ्लुईड म्हणजेच ड्राय सीरम वेगळं केलं जातं. या सीरमध्ये असलेले अन्य पदार्थ आणि सुक्ष्म तत्वांची चाचणी केली जातो.  या सीरममध्ये  जर एंटीबॉडीज दिसून आल्या तर त्या व्हायरसला संपवण्यासाठी प्रभावी ठरतात. त्यावेळी सीरो इम्युनिटी असल्याचं म्हटलं जातं. रक्तात प्रवाहित होत असलेल्या सीरमध्ये एंटीबॉडीज, एंटीजन्स, हार्मोन्स, प्रोटीन्स आणि  मायक्रोब्स असू शकतात. या सीरममध्ये आरबीसी म्हणजे रक्ताच्या लाल पेशी आणि  पांढऱ्या पेशी नसतात. 

एंटीबॉडीज आणि इम्यून सेल्स

शरीरात एंटीबॉडीज आणि इम्यून सेल्स या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. पण  दोन्हींचे उद्दीष्ट एकच असते. शरीराला व्हायरसपासून वाचवण्याासठी तसंच नुकसानकारक पॅथोजन्स आणि बॅक्टेरिया व्हायरसला लवकरात लवकर नष्ट करता येऊ शकतं. रक्तात उपस्थित असलेल्या सीरममध्ये एंटीबॉडी तयार होत असतात आणि इम्यून सेल्स या रक्तात समाविष्ट असतात. सीरम हा शरीरातील रक्ताचाच एक भाग आहे. 

इम्यून सेल्सना टी सेल्स असं  ही म्हणतात. पांढरे इम्यून सेल्स टी सेल्स संबंधित असतात. या सेल्सचं काम शरीरात प्रवेश करत  असलेल्या नुकसानकारक पॅथोजन्सवर नजर ठेवणं असतं. याशिवाय एंटीबॉडी तयार होत नाहीत तोपर्यंत बॅक्टेरिया आणि व्हायरसचा प्रसार वाढत जातो. एंटीबॉडी व्हायरसचा प्रसार रोखण्याचं काम करतात. 

सर्वेक्षणातून काय समोर आलं?

शहरातील अनेक सिविल कॉर्पोरेशंस आणि देशांतील काही प्रमुख रिसर्च संस्थानांच्या (TIFR, IISER) सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार पुण्यातील काही भागांमधील ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांच्या शरीरात एंटीबॉडी तयार झाल्याची आकडेवारी समोर आली. एक चतुर्थांश व्यक्तींच्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या एंटीबॉडी तयार झाल्याचं समोर आलं आहे.

याशिवाय मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ५७ टक्के व्यक्तींच्या शरीरातही सीरो-पॉझिटिव्हिटी दिसून आली. दिल्लीतही नुकतंच सीरो सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात २३ टक्के व्यक्ती सीरो-पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. दिल्लीतल्या दुसऱ्या टप्प्यातल्या सीरो सर्वेक्षणाचा अहवाल याच आठवड्यात येणार आहे.

शरीरात एंटीबॉडीज तयार होणं म्हणजेच कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढली आहे. महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्‍य डॉ शशांक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत हा एकमेव असा देश आहे. ज्या देशात जास्त सीरो पॉझिटिव्हीटी दिसून आली आहे. यातून रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असल्याचं दिसून येत आहे. शरीरात तयार झालेल्या एंटीबॉडी व्यक्तीचा कोरोनापासून बचाव करतात. रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्या व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडी आढळून येतात. मात्र या अँटीबॉडीमुळे किती काळ कोरोनापासून बचाव होतो, याबद्दल अद्याप तज्ज्ञांनी आपलं मत स्पष्ट केलेलं नाही.

हे पण वाचा-

निरोगी राहण्यासाठी रोज किती चालायला हवं? जाणून घ्या ५ ते ६० वर्ष वयोगटाचा प्रभावी 'वॉक प्लॅन'

भारतामध्ये चौथ्या कोरोना प्रतिबंधक लसीचेही उत्पादन

युद्ध जिंकणार! शरीरातील कोरोना प्रसाराला रोखणार 'वॅकिओलिन' आणि 'एपिलिमोड' ही दोन औषधं, तज्ज्ञांचा दावा

Web Title: What is seropositivity and how it is different from immunity or immune cells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.