वयानुसार किती असायला हवं पुरूषांचं वजन? जाणून घ्या उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 09:41 AM2024-05-04T09:41:10+5:302024-05-04T09:41:32+5:30
अनेकांना असाही प्रश्न पडतो की, वयानुसार आपलं वजन किती असायला हवं? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Healthy Weight For Men's: आजकाल जगभरात लठ्ठपणाची समस्या खूप वाढली आहे. लोक वाढत्या वजनामुळे हैराण झाले आहेत. पण याला कारणीभूत त्यांचीच चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी असतात. महिलांसोबतच पुरूषांमध्येही लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. या कारणाने लोकांना डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आणि इतर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. अशात आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. सोबतच असाही प्रश्न पडतो की, वयानुसार आपलं वजन किती असायला हवं? तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काय असतो बीएमआय?
बीएमआय उंची आणि वजनाच्या आधारावर शरीरातील फॅटचं प्रमाण जाणून घेण्याची एक पद्धत आहे. यानुसार 18.5 ते 25 दरम्यानचा बीएमआय सगळ्यात बरोबर मानला जातो आणि जर बीएमआय 25 ते 30 दरम्यान असेल ओव्हरवेट आणि जर 30 पेक्षा जास्त असेल तर लठ्ठपणाकडे इशारा करतो. तेच बीएमआय रेट जर 18.5 पेक्षा कमी असेल तर तो अंडरवेट गटात येतो.
बॉडी मास इंडेक्स
बीएमआय मोजण्याचं उदाहरण समजून घेण्यासाठी समजा की, तुमचं वजन 58 किलो आहे आणि लांबी 165 सेंटीमीटर म्हणजे 1.65 मीटर आहे. आता बीएमआय काढण्यासाठी 1.65 ला 1.65 ने गुणाकार करा. जे उत्तर येईल त्याचा 58 ने भागाकार करा जो रिझल्ट येईल तोच तुमचा बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्ट असेल.
वयानुसार किती असावं वजन
नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशनने आइडिअल वजनाबाबत सांगितलं की, 19 ते 39 वयात पुरूषांचं वजन 65 किलोच्या आसपास असायला हवं. जे 2010 पर्यंत 60 किलो होतं. पण 2020 पासून ते 5 किलोने वाढवलं. एका दुसऱ्या रिपोर्टनुसार, 19 ते 39 वर्षाच्या पुरूषांचं वजन 83.4 किलो, 30 ते 39 वर्षाच्या पुरूषांचं वजन 90.3 किलो, 40 ते 49 वर्षाच्या पुरूषांचं वजन 90.9 किलो, 50 ते 60 वयाच्या पुरूषांचं वजन 91.3 किलो असायला हवं.