श्रावणात कसा असायला हवा तुमचा आहार? जाणून घ्या हेल्दी पर्याय...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 09:45 AM2024-07-27T09:45:10+5:302024-07-27T09:45:55+5:30
आज आम्ही सांगणार आहोत की, तुम्ही या दिवसांमध्ये काय खायला हवं जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील.
श्रावणाला सुरूवात झाली आहे. या महिन्यात भगवान शिवाची आराधना केली जाते आणि लोक दर सोमवारी उपवास करतात. या दिवसांमध्ये लोक सात्विक आहार घेतात. जे लो उपवास करतात त्यांनी या दिवसात खाण्या-पिण्याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आज आम्ही सांगणार आहोत की, तुम्ही या दिवसांमध्ये काय खायला हवं जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील.
1) साबूदाना
साबूदाना उपवासाच्या दिवसात भरपूर लोक खातात. साबूदान्यामध्ये भरूर फाबरत असतं आणि इतरही आवश्यक पोषक तत्व असतात. ज्यामुळे साबूदाना एक पौष्टिक आहार ठरतो. साबूदान्याची खिचडी किंवा वडे बनवून खाऊ शकता. हा एक हेल्दी आहार ठरेल आणि तुमचं पोटही चांगलं राहील.
2) फळं
श्रावणात तुम्ही वेगवेगळी फळं खाऊ शकता. या दिवसात अनेक फळं बाजारात मिळतात. या दिवसात काही फळं खाल तर पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. केळी, सफरचंद, द्राक्ष. पपई यांचं सेवन तुम्ही करू शकता. याने पोट तर चांगलं राहीलच सोबतच शरीराला अनेक फायदेही मिळतील.
3) ड्राय फ्रूट्स
घरातील मोठे लोक रोज मुठभर ड्राय फ्रूट्स खाण्याचा सल्ला देतात. या पवित्र महिन्यातही असं करून तुम्ही हेल्दी राहू शकता. यात अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि पोषक तत्व असतात. हे तुम्ही दिवसा कोणत्याही वेळी खाऊ शकता. ड्राय फ्रूट्स हे एक चांगलं नाश्ता ठरू शकतात. बदाम, काजू आणि एकत्र करून खाऊ शकता.
4) खोबरं
या दिवसात तुमच्या आहारात खोबऱ्याचा समावेश करायला हवा. याने आरोग्याला वेगवेगळे फायदे मिळतात. याचा तुम्ही वेगवेगळ्या पदार्थामध्ये समावेश करून सेवन करू शकता. याने पदार्थांची टेस्टही वाढते.
5) शेंगदाणे
शेगदाण्यांमध्ये भरपूर प्रोटीन असतं ज्यामुळे शरीराला खूप फायदे मिळतात. याने पोट भरलेलं राहतं आणि भूक कमी लागते. शेंगदाण्याच्या सेवनाने हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. मात्र, याचं सेवन कमी प्रमाणात करावं. जास्त शेंगदाणे खाल्ले तर मळमळ होऊ शकते.