दुधी भोपळ्याच्या भाजीसोबत कशाचं सेवन करू नये? वाचाल तर रहाल फायद्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 10:40 AM2024-10-16T10:40:21+5:302024-10-16T10:40:58+5:30

What not to eat with gourd : या भाजीचं सेवन नियमितपणे केल्याने मेटाबॉलिज्मचं मजबूत होतं. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, या भाजीसोबत कशाचं सेवन करू नये? आज तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

what should not eat with bottle gourd? | दुधी भोपळ्याच्या भाजीसोबत कशाचं सेवन करू नये? वाचाल तर रहाल फायद्यात...

दुधी भोपळ्याच्या भाजीसोबत कशाचं सेवन करू नये? वाचाल तर रहाल फायद्यात...

What not to eat with gourd : दुधी भोपळ्याची भाजी किंवा पराठे भरपूर लोक आवडीने खातात. यांची टेस्ट तर चांगली असतेच सोबतच यातून अनेक पोषक तत्व जसे की, व्हिटॅमिन सी, बी आणि के यांच्यासोबतच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, आयर्न, झिंकही मिळतं. याने तुमच्या त्वचेसोबतच तुमच्या शरीरालाही अनेक फायदे मिळतात. या भाजीचं सेवन नियमितपणे केल्याने मेटाबॉलिज्मचं मजबूत होतं. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, या भाजीसोबत कशाचं सेवन करू नये? आज तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दुधी भोपळ्यासोबत काय खाऊ नये?

- दुधी भोपळ्यासोबत पत्ता कोबीचं सेवन अजिबात करू नये असं आयुर्वेद सांगतं. यामुळे तुम्हाला गॅसची समस्या होऊ शकते. ज्या लोकांना पोटाची समस्या आहे, त्यांना दुधी भोपळ्यासोबत पत्ता कोबी आणि ब्रोकलीचं सेवन करणं टाळलं पाहिजे. 

- तुम्ही दुधी भोपळ्यासोबत कारल्याचं सुद्धा सेवन करू शकता. याने तुम्हाला उलटी होऊ शकते, नाकातून रक्त येऊ शकतं आणि चक्कर येण्याची समस्याही होऊ शकते. 

- या भाजीसोबत आंबट फळांचं देखील सेवन करणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. याने पोटादुखी किंवा पोटासंबंधी इतर समस्या होऊ शकतात. तसेच या भाजीसोबत डेअरी प्रोडक्टही खाणं टाळलं पाहिजे. तसेच 

दुधी भोपळ्याचे फायदे

जर तुम्ही नियमितपणे दुधी भोपळ्याच्या ज्यूसचं सेवन केलं तर याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि इम्यून सिस्टीमही बूस्ट होतं. सोबतच तुमचं वजनही नियंत्रणात राहतं. हे ज्यूस तुमच्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतं.

कोलेस्ट्रॉल कमी होतं

दुधी भोपळ्याच्या भाजीचं नियमित सेवन केलं तर शरीरातील कोलेस्ट्रॉल सहजपणे कमी होतं. याने कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते. याचा ज्यूस एक आदर्श पेय मानला जातो.

यूरिनरी डिसऑर्डर

यूरिनरी डिऑर्डर म्हणजे लघवीसंबंधी समस्यांमध्ये दुधी भोपळा फार फायदेशीर ठरतो. याने शरीरातील सोडियमचं प्रमाण कमी केलं जातं. ते लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतं.

डायबिटीसमध्ये फायदेशीर

डायबिटीसच्या रूग्णांसाठी दुधी भोपळ्याचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. डायबिटीसमध्ये रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचं सेवन करणं चांगलं असतं.

पचन तंत्र मजबूत होतं

दुधी भोपळा पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. सोबतच अ‍ॅसिडिटीही दूर केली जाते. तसेच दुधी भोपळ्याने पचनासंबंधी समस्याही दूर होतात.

Web Title: what should not eat with bottle gourd?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.