दोन तासांपेक्षा जास्त एकाच पोजिशनमध्ये बसून राहिल्याने होतात 'या' गंभीर समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 03:52 PM2023-01-17T15:52:44+5:302023-01-17T15:55:28+5:30

Health Tips : दोन तासांपेक्षा जास्त एकाच पोजिशनमध्ये बसून राहिल्याने अकाली मृत्यूचा धोका अनेक पटीने वाढतो. असं केल्याने अनेक प्रकारचं नुकसान होतं. चला जाणून घेऊ काय होतं.

What sitting too long same position does your body | दोन तासांपेक्षा जास्त एकाच पोजिशनमध्ये बसून राहिल्याने होतात 'या' गंभीर समस्या!

दोन तासांपेक्षा जास्त एकाच पोजिशनमध्ये बसून राहिल्याने होतात 'या' गंभीर समस्या!

googlenewsNext

Health Tips :  वर्किंग लोक कामाच्या प्रेशरमुळे तासन्तास एकाच जागेवर आणि एकाच पोजिशनमध्ये बसून काम करतात. त्यांना असं बसण्याची सवयच लागलेली असते. अनेकजण एकाच पोजिशनमध्ये तासन्तास बसलेले असतात. त्यांना या गोष्टीचा अजिबात अंदाज नसतो की, ते त्यांच्या आरोग्यासोबत खेळत आहेत. हे आम्ही नाही सांगत तर एका रिसर्चमधून समोर आलं आहे. या रिसर्चनुसार, दोन तासांपेक्षा जास्त एकाच पोजिशनमध्ये बसून राहिल्याने अकाली मृत्यूचा धोका अनेक पटीने वाढतो. असं केल्याने अनेक प्रकारचं नुकसान होतं. चला जाणून घेऊ काय होतं.

अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरच्या रिसर्चनुसार, दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ एकाच पोजिशनमध्ये बसून राहिल्याने अकाली मृत्यूचा धोका अनेक पटीने वाढतो. रिसर्चनुसार सतत खुर्चीवर बसून राहिल्याने वेगवेगळ्या आजारांनी मृत्यूचा धोका २७ टक्के आणि टेलिव्हिजन बघून होणाऱ्या आजारांनी मृत्यूचा होण्याचा धोका १९ टक्के वाढतो.

पाठीचा मणका होतो खराब

एकाच स्थिती जास्त वेळ बसून राहिल्याने पाठीचा मणक्यावर आणि हाडांवर जास्त दबाव पडतो. तसेच सरळ न बसता वाडके होऊन बसल्याने मणक्याची हाडे आणि जॉइंट्स खराब होऊ शकतात. याने पुढे जाऊन पाठीत दुखणे आणि मान दुखणे अशा समस्या अधिक होऊ शकतात.

कोलेस्ट्रॉलची होऊ शकते समस्या

जास्त वेळ बसून राहिल्याने मांसपेशीतील चरबी कमी खर्च होते. ज्यामुळे फॅटी अॅसिड हृदयाच्या कार्यप्रणालीमध्ये अडचण निर्माण करतं. एकाच स्थितीत जास्त वेळ बसून राहिल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक वाढतं आणि सोबतच अनेक प्रकारचे कॅन्सर व इतरही गंभीर आजार होऊ शकतात. 

ऑक्सिजन मिळू शकत नाही

अनेक रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, कुणीही जास्त वेळेसाठी बसत किंवा कमी वेळेसाठी बसून राहत असेल त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त वेळ बसून राहिल्याने आपल्या मांसपेशी क्रियाशील राहत नाहीत. ज्यामुळे आपल्या मेंदूला पुरेसं रक्त आणि ऑक्सिजन मिळू शकत नाही.

काय घ्याल काळजी?

- खुर्चीवर बसताना सरळ बसा आणि पाय जमिनीवर ठेवा. अनेकदा खुर्चीवर बसताना लोक खुर्चीची उंची वाढवतात आणि पाय हवेत लटकत असतात. ही बसण्याची फारच घातक स्थिती आहे. कारण हवेत पाय लटकल्याने कंबरेच्या हाडावर दबाव पडतो, ज्याने गुडघ्यात आणि पायांमध्ये वेदना होतात. याने कंबर आणि पायांसोबतच पाठीचा कणाही प्रभावित होतो. 

- खुर्चीवर बसताना पायांना जमिनीवर ठेवा. कधीही पुढच्या बाजूने वाकून बसू नका. तुमचं पूर्ण वजन हे खुर्चीच्या मागच्या बाजूला ठेवा. कॉम्प्युटर तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. काम करताना पाय क्रॉस करून बसणेही योग्य नाही. कारण पाय क्रॉस करून बसल्याने पॅरोनोल नसा दबण्याची भिती असते.

Web Title: What sitting too long same position does your body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.