स्विमर्स इअर इन्फेक्शन म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 11:59 AM2021-07-06T11:59:55+5:302021-07-06T12:00:34+5:30

असे अनेक आजार आहेत ज्याची आपल्याला माहितीही नसते. हे आजार झाल्यावर आपल्या लक्षात येतं की असे आजारही आहेत. असाच एक आजार म्हणजे स्विमर्स इअर. या आजाराविषयी तुम्ही पूर्वी कधी ऐकलंही नसेल. काय आहे हा आजार चला जाणून घेऊया.

What is a swimmer's ear infection? Know the symptoms and remedies | स्विमर्स इअर इन्फेक्शन म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

स्विमर्स इअर इन्फेक्शन म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे अन् उपाय

Next

असे अनेक आजार आहेत ज्याची आपल्याला माहितीही नसते. हे आजार झाल्यावर आपल्या लक्षात येतं की असे आजारही आहेत. असाच एक आजार म्हणजे स्विमर्स इअर. या आजाराविषयी तुम्ही पूर्वी कधी ऐकलंही नसेल. काय आहे हा आजार चला जाणून घेऊया. डॉ. अंकूर गुप्ता यांनी ओन्लीमायहेल्थ या संकेतस्थळाला याची माहिती दिली आहे.
काय आहे स्वीमर्स इअर 
हा असा आजार आहे ज्यात स्विमिंग करताना किंवा आंघोळ करताना कानात पाणी गेल्याने इन्फेक्शन होणं. जेव्हा कान जंतूंनी भरलेल्या पाण्याच्या संपर्कात येतो तेव्हा हे इन्फेक्शन होते. स्वीमर्स इअर तेव्हाच होतो जेव्हा कानात पाणी जास्त असते.


याची लक्षणे
कान बंद असल्यासारखा वाटणे
कानातल्या नळीत सुज येणे
कान लाल होणे
कानात खाज येणे
कान दुखणे
उपाय
स्वीमर्स इअरपासून बचाव करण्यासाठी पोहताना आपले डोके एका बाजूला झुकवावे.
कानात पाणी गेल्यावर दात चावत चावत एका बाजूला झुकावे. कानातील पाणी पडून जाईल.
कानात पाणी गेल्यावर कान बंद करून लांब श्वास घ्या आणि सोडा. याने कानातलं पाणी निघुन जाईल.
अधिक त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरकडे जा व सल्ला घ्या.

Web Title: What is a swimmer's ear infection? Know the symptoms and remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.