99 टक्के लोकांना माहीत नाही हिवाळ्यात कोणत्या वेळी उन्हात बसावं, कधी मिळतं व्हिटॅमिन डी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 09:28 AM2022-11-19T09:28:04+5:302022-11-19T09:28:22+5:30
Best time for vitamin D from sunlight: तुम्ही जास्त वेळ उन्हात बसल्याने तुम्हाला जास्त फायदा मिळेल. त्यामुळे हे माहीत असायला हवं की, सूर्य प्रकाश कोणत्या वेळी घ्यावा. याने तुम्हाला काय-काय फायदे मिळतात.
Best time for vitamin D from sunlight: उन्हाळ्यात लोक जेवढे उन्हापासून पळतात जेवढे ते हिवाळ्यात उन्हाच्या जवळ राहतात. उन्हाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, सूर्य प्रकाशापासून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं. पण उन्हापासून व्हिटॅमिन डी तुम्हाला केंव्हा मिळतं हे तुम्हाला माहीत आहे का? असं अजिबात नाही आहे की, तुम्ही जास्त वेळ उन्हात बसल्याने तुम्हाला जास्त फायदा मिळेल. त्यामुळे हे माहीत असायला हवं की, सूर्य प्रकाश कोणत्या वेळी घ्यावा. याने तुम्हाला काय-काय फायदे मिळतात.
व्हिटॅमिन डी घेण्याची योग्य वेळ
सकाळी - जर तुम्हाला सकाळच्या वेळी व्हिटॅमिन डी घ्यायचं असेल तर सकाळी 8 वाजता तुम्ही 25 ते 30 मिनिटे उन्हात बसू शकता. कारण यावेळी उन्ह कोवळं राहतं आणि व्हिटॅमिन डी अधिक जास्त मिळतं.
सायंकाळी - जर तुम्हाला सायंकाळी सूर्य प्रकाशापासून व्हिटॅमिन डी घ्यायचं असेल तर तुम्ही सूर्य बुडण्याआधी सूर्य प्रकाशात बसावं.
उन्हापासून मिळणारे फायदे
व्हिटॅमिन डी
सूर्य प्रकाशात थोडा वेळ बसलण्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. यातील सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे व्हिटॅमिन डी. आजच्या काळात अनेक लोकांना व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवते. हे व्हिटॅमिन आपल्या शरीराच्या इम्यून सिस्टीमला मजबूत करण्याचं काम करतं. त्याशिवाय आपल्या शरीराला ऊर्जा देतं.
सूर्य प्रकाशातील यूवीए
सूर्य प्रकाशातून शरीराला यूवीए मिळतं. ज्यामुळे आपला रक्त प्रवाह चांगला राहतो. त्याशिवाय याने ब्लड ग्लूकोज लेव्हलही चांगली राहते.
झोपेसाठी फायदेशीर
जर तुम्हाला झोप येण्यासंबंधी काही समस्या असेल तर तुमच्यासाठी सूर्य प्रकाश फार फायद्याचा आहे. कारण याने तुम्हाला चांगली झोप लागेल. सूर्य प्रकाश मेलाटोनिन नावाचं हार्मोन असतं. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येते.