रोज ५००० पाऊलं चालून वजनात काहीच फरक पडत नाही का? मग तुम्ही 'या' चूका करत असाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 09:49 AM2022-05-23T09:49:53+5:302022-05-23T09:52:36+5:30
सामान्यत: माणसं ५००० पाऊलं चालतात. पण इतकं चालुनही अनेकांचं वजन कमी होत नाही. मग अशावेळी काय करावे? जेणेकरुन वजन कमी होईल. अनेकदा यामागे तुम्ही करत असलेल्या चुकाही कारणीभूत असतात. या चुका काय आहेत? त्या कशा सुधाराव्यात? घ्या जाणून....
वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा व्यायाम म्हणजे चालणे. डॉक्टरही अनेक वजन वाढल्यामुळे निर्माण झालेल्या समस्या कमी करण्यासाठी चालण्याचा सल्ला देतात. सामान्यत: माणसं ५००० पाऊलं चालतात. पण इतकं चालुनही अनेकांचं वजन कमी होत नाही. मग अशावेळी काय करावे? जेणेकरुन वजन कमी होईल. अनेकदा यामागे तुम्ही करत असलेल्या चुकाही कारणीभूत असतात. या चुका काय आहेत? त्या कशा सुधाराव्यात? घ्या जाणून....
हे सत्य आहे की शरीराला अनेक फायदे होतात. तसेच हार्ट अटॅक, हाय कॉलेस्ट्रॉल सारखे आजार दुर होतात. पण चालण्यामुळे प्रत्येकाचे वजन कमी होतेच असे नाही. जर ५००० पाऊले चालूनही तुमचे वजन कमी होत नसेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे.
रोज ५००० पाऊले चालल्यावरही वजन कमी झाले नाही तर काय करावे?
- अशावेळी चालण्यासोबत तुम्ही अर्धातास व्यायाम करावा. वेगवेगळेप्रकारचे व्यायाम केल्याने फॅट बर्न होईल आणि पोटाच्या आसपासची चरबी कमी होईल.
- तुम्ही तुमच्या आहारातुन ऑईली फुड्सना काढुन टाका. यामुळे तुमच्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढणार नाही. त्यामुळे तुमचे वजन कमी होते.
- गोड पदार्थांपासून लांब रहा. गोड पदार्थ खाल्ल्यामुळे वजन कमी होतच नाही उलट डायबिटीस होण्याचा धोका वाढतो.
- डिटॉक्स ड्रिंक, डिटॉक्स ज्युस पिऊन शरीर स्वच्छ ठेवा.
- पालेभाज्या, हंगामी फळे, सॅलड किंवा स्प्राऊट खाऊन तुम्ही तुमचे मेटाबॉलिज्म बुस्ट करु शकता
- चालताना नेहमी हायड्रेट राहण्याचा प्रयत्न करा. शक्य तितके पाणी प्या.