गायब होईल तुमची पोटावरील चरबी, हिवाळ्यात 'या' खास फूड्सचं करा सेवन!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 04:58 PM2024-11-02T16:58:07+5:302024-11-02T17:08:26+5:30
Weight Loss Vegetable : तुम्हीही पोटावरील चरबी कमी करून स्लीम फीट होण्याचा प्रयत्न करत असाल तर या दिवसात काय खावे हे आम्ही सांगणार आहोत.
Weight Loss Vegetable : आजकाल चुकीची लाइफस्टाईल, तणाव-चिंता, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे जास्तीत जास्त लोकांचं पोट बाहेर निघतं. म्हणजे पोटावर चरबी जमा होते. एकदा का लठ्ठपणा वाढला तर मग डायबिटीस, हृदयरोग, ब्लड प्रेशरचाही धोका वाढतो. हिवाळ्यात सामान्यपणे वजन कमी करण्यासाठी पोषक वातावरण असतं. अशात तुम्हीही पोटावरील चरबी कमी करून स्लीम फीट होण्याचा प्रयत्न करत असाल तर या दिवसात काय खावे हे आम्ही सांगणार आहोत.
हिवाळ्यात काही खास पदार्थांचं सेवन करायला हवं. कारण या दिवसात या खास पदार्थांमुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. सोबतच एनर्जी जास्त वाढते. चला जाणून घेऊन हिवाळ्यात कोणत्या पदार्थांच्या मदतीने तुम्ही चरबी कमी करू शकाल.
फ्लॉवर
वजन कमी करण्यासाठी फ्लॉवर फायदेशीर ठरते. पोटावरील चरही बर्न करण्यासाठी हिवाळ्यात फ्लॉवरचं सेवन करावं. यात अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. त्यासोबतच फ्लॉवरमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असतात, ज्याने शरीराचं मेटाबॉलिज्म मजबूत राहतं. मेटाबॉलिज्म मजबूत असेल तर वजन कमी करण्यासही मदत मिळते. त्यामुळे हिवाळ्यात फ्लॉवरची भाजी भरपूर खावी.
मटर
हिवाळ्यात मटारही भरपूर मिळतात. लोक आवडीने मटारचं वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करतात. मटारमध्ये प्रोटीन्ससोबतच फायबरही भरपूर प्रमाणात असतं. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मटार सर्वात चांगली भाजी मानली जाते. तुम्ही सकाळच्या नाश्त्यात मटार खाऊ शकता. याने दिवसभरासाठी आवश्यक प्रोटीन आणि कॅल्शिअमची तुमची गरज पूर्ण होते.
गाजर
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी गाजर खूप फायदेशीर ठरतं. गाजरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. ज्याने भूक कमी लागते आणि शरीराला आवश्यक पोषणही मिळतं. गाजरातून व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी मिळतं जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. पोटाची समस्या आणि अॅसिडिटीची समस्याही गाजराने दूर होते. लाल गाजर पोटावरील चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर असतात.
आलं आणि लसूण
पोटावरील चरबी दूर करण्यासाठी आलं आणि लसूणही फायदेशीर ठरतं. आलं आणि लसणात हाय अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे लोक फार जास्त खातात त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय मानला जातो. त्यामुळे आलं आणि लसणाचा आहारात समावेश करा. आल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होते. बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी झाल्याने पोटावरील चरबीही वेगाने कमी होते.