केसगळती थांबवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात मिक्स करा या गोष्टी, मग बघा कमाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 02:13 PM2024-06-20T14:13:37+5:302024-06-20T14:15:47+5:30
Hair Growth: अनेकांना केसगळती थांबवण्याचा खास घरगुती उपाय माहीत नसतो. हाच उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Hair Growth: केसगळतीची समस्या आजकाल सगळ्यांनाच खूप होत आहे. याला कारणही आपली आजची चुकची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आहेत. लोक केसगळती थांबवण्यासाठी वेगवेगळे तेल आणि केमिकल्सचा वापर करतात. पण अनेकांना केसगळती थांबवण्याचा खास घरगुती उपाय माहीत नसतो. हाच उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सगळ्यांनाच हे माहीत आहे की, केसांना तेल लावणं किती फायदेशीर आहे. खासकरून खोबऱ्याचं तेल केसांसाठी जास्त फायदेशीर ठरतं. पण अनेकांना हे माहीत नाही की, खोबऱ्याच्या तेलात काही दुसऱ्या गोष्टी मिक्स केल्या तर केसगळतीची समस्या कधीच होणार नाही. केसांना या उपायाने जास्त पोषण मिळतं. अशात तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, केसगळती थांबवण्यासाठी आणि केस मजबूत करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात काय मिक्स करून लावलं पाहिजे.
खोबऱ्याच्या तेलाचे फायदे
केसांना खोबऱ्याचं तेल असंच लावू शकता. एक वाटीमध्ये खोबऱ्याचं तेल घेऊन हलकं गरम करा. या तेलाने डोक्याच्या त्वचेची आणि केसांची हलक्या हाताने मालिश करा. तेल लावल्यावर अर्ध्या तासाने केस धुवून घ्या. हवं असेल तर हे तेल तुम्ही केसांना असं रात्रभरही ठेवू शकता. याने डोक्याची त्वचा मजबूत होते.
खोबऱ्याचं तेल आणि कढीपत्ते
कढीपत्ते केसांसाठी खूप फायदेशीर असतात. अशात तुम्ही जर कढीपत्ते आणि खोबऱ्याचं तेल मिक्स करून केसांना लावलं तर अधिक फायदा मिळू शकतो. याने केस पातळही होत नाहीत. २ चमचे खोबऱ्याचं तेल कमी आसेवर गरम करा आणि त्यात १० ते १२ कढीपत्ते टाका. कढीपत्ते थोडे भाजले की, गॅस बंद करा. तेल कोमट असेल तेव्हा केसांवर लावा. हे तेल साधारण ४५ मिनिटे केसांचा तसंच राहू द्या. त्यानंतर केस धुवून घ्या. याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
खोबऱ्याचं तेल, दूध आणि केळी
हा एक खास हेअर मास्क आहे. हा मास्क केसांवर लावल्यावर केस लांब होतात. मुलायम होता आणि केस चमकदारही होतात. हा हेअर मास्क बनवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात थोडं दूध आणि एक केळी चुरून मिक्स करा. हा हेअर मास्क केसांवर एक तास लावून ठेवा आणि त्यानंतर केस धुवून घ्या. पंधरा दिवसातून एकदा हा उपाय करा. तुम्हाला फरक दिसून येईल.