केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर, मुलायम-चमकदार होतील केस!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 04:12 PM2024-05-01T16:12:12+5:302024-05-01T16:12:41+5:30
मेहंदीमध्ये काही गोष्टींचा वापर करावा लागेल. याने कोंडाही दूर होईल आणि केसही मजबूत व चमकदार होतील. चला जाणून घेऊ कसे तयार करा खास हेअर पॅक...
केसात कोंडा होण्याची समस्या केवळ महिलांनाच नाही तर पुरूषांना देखील होते. उन्हाळ्यात तर धूळ, घाम आणि उन्हामुळे केसात जास्त कोंडा होतो. बरेचजण शॅम्पूने केसातील कोंडा दूर करता येतो. सोबतच काही घरगुती उपायांचा वापर करूनही केसांमध्ये कोंडा दूर करता येतो. यासाठी मेहंदीमध्ये काही गोष्टींचा वापर करावा लागेल. याने कोंडाही दूर होईल आणि केसही मजबूत व चमकदार होतील. चला जाणून घेऊ कसे तयार करा खास हेअर पॅक...
1) मेथीच्या बीया
मेथीच्या बियांमध्ये निकोटिनिक अॅसिड असतं. जे बॅक्टेरियांसोबत लढण्यास आणि डॅंड्रफ साफ करण्यास मदत करतं. मेहंदी आणि मेथीच्या बियांचं मिश्रण लावलं तर केसगळतीही कमी होते. केस चमकदारही होतात. यासाठी दोन चमचे मेथीच्या बीया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी बीया बारीक करा. आता एका वाटीमध्ये 4 चमचे मेहंदी पावडर घ्या. यात मेथीची पेस्ट आणि 2 चमचे ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. ही पेस्ट डोक्याच्या त्वचेवर लावा. साधारण अर्ध्या तासांनंतर माइल्ड शॅम्पूने केस धुवून घ्या. आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.
2) मेहंदीमध्ये लिंबू, योगर्ट
बाजारातून फ्रेश मेहंदी घेऊन किंवा मेहंदी पाने सुकवून त्याची पावडर करा. बाजारात मिळणारी केमिकल्स युक्त मेहंदी पावडरची वापर न केल्यास योग्य होईल. एका वाटीमध्ये 4 चमचे मेहंदी पावडर, एका लिंबाचा रस आणि गरज असेल तर योगर्ट टाका. आता हेअर हा हेअर पॅक केसांच्या मुळापासून लावा. 30 मिनिटे हा पॅक तसाच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने केस धूवा. त्यानंतर कमी केमिकल असलेल्या शॅम्पूने केस धूवा.
3) मेहंदी आणि अंड
एका वाटीमध्ये 3 चमचे मेहंदी पावडर, एक चमचा ऑलिव ऑइल 2 अंडी आणि गरजेनुसार पाणी टाकून मिश्रण तयार करा. हे मिश्रण तयार करताना ही काळजी घ्या की, मेहंदी अंड्यामुळे घट्ट होऊ नये. हा हेअर पॅक डोक्याची त्वता आणि केसांवर लावा. हा हेअर पॅक सुकल्यानंतर शॅम्पूने केस धुवा.