बदाम कसे खावेत? भाजलेले, सुके की भिजवलेले? जाणून घ्या कोणते बदाम शरीरासाठी फायदेशीर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 02:10 PM2021-11-18T14:10:36+5:302021-11-18T14:11:23+5:30

काहींना भाजलेले बदाम खायला आवडतात, काहींना सुके बदाम खातात, तर काहींना भिजवलेले बदाम खातात. या सगळ्यात सर्वात फायदेशीर बदाम भिजवून खाल्ल्याचे होतात असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

what type of almonds good for health roasted, soaked or dry | बदाम कसे खावेत? भाजलेले, सुके की भिजवलेले? जाणून घ्या कोणते बदाम शरीरासाठी फायदेशीर...

बदाम कसे खावेत? भाजलेले, सुके की भिजवलेले? जाणून घ्या कोणते बदाम शरीरासाठी फायदेशीर...

googlenewsNext

बदामाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते हे तर सर्वांनाच माहिती आहे, पण तुमच्यासाठी कोणते बदाम जास्त फायदेशीर आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? काहींना भाजलेले बदाम खायला आवडतात, काहींना सुके बदाम खातात, तर काहींना भिजवलेले बदाम खातात. या सगळ्यात सर्वात फायदेशीर बदाम भिजवून खाल्ल्याचे होतात असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.

बदामामध्ये पोषक घटक आढळतात
बदामामध्ये फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, मॅंगनीज, तांबे आणि फॉस्फरस यांसारखे अनेक पोषक घटक असतात. म्हणूनच लोकांना बदाम खायला आवडतात, हे सर्व घटक निरोगी शरीरासाठी खूप फायदेशीर आणि आवश्यक मानले जातात.

आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात ?
जर तुम्ही सुके बदाम किंवा भाजलेले बदाम खाल्ले तर तुमच्या शरीराला त्यामध्ये असलेल्या झिंक आणि लोहाचा योग्य प्रमाणात फायदा होत नाही. तसेच, त्यात असलेले फायटिक अ‍ॅसिड कमी होत नाही. हे नंतर पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणते. यामुळेच बदाम नेहमी भिजवून खावेत. चला जाणून घेऊया भिजवलेले बदाम खाण्याचे जबरदस्त फायदे.

- भिजवलेल्या बदामामध्ये व्हिटॅमिन ई सोबत अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे तुमच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. सुरकुत्या आणि निस्तेज त्वचेपासून मुक्तता मिळण्यास मदत होते.

- भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीरात लाइपेज सारखे काही एन्झाइम्स रिलीज होतात. ते चयापचय वाढवतात आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

- बदाम भिजवल्याने त्यातील अशुद्धताही निघून जाते, ज्यामुळे शरीराला काही पोषक द्रव्ये शोषण्यास फायदा होतो.

- भिजवलेले बदाम खाणे पचनासाठी खूप फायदेशीर आहे. प्रथम, ते भिजवल्यानंतर खूप मऊ होतात आणि ते चघळण्यास आणि पचण्यास सोपे असतात.

- भिजवलेले बदाम खाल्ल्याने मनही तीक्ष्ण होते. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई मेंदूची क्षमता वाढवण्यास मदत करते. यामुळे स्मरणशक्तीही वाढते.

Web Title: what type of almonds good for health roasted, soaked or dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.