Vitamin D ची कमतरता असल्यास दिसतात ही लक्षणे, चुकूनही करु नका दुर्लक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 12:01 PM2018-10-29T12:01:29+5:302018-10-29T12:02:50+5:30
व्हिटॅमिन डी ची शरीरात कमतरता असेल तर वेगवेगळ्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो.
(Image Credit : NutraIngredients)
व्हिटॅमिन डी ची शरीरात कमतरता असेल तर वेगवेगळ्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि पोषण मिळवण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असणं गरजेचं असतं. पण सद्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनेकांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे व्यक्तीला नेहमी थकवा जाणवतो. इतकेच नाही तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होऊ लागतात. ज्या व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते ते व्यक्ती नेहमी आळस करताना दिसतात.
व्हिटॅमिन डी हे मनुष्याला काही पदार्थ आणि सूर्य प्रकाशातून मिळतात. व्हिटॅमिन डी हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे व्हिटॅमिन डी २ आणि दुसरं व्हिटॅमिन डी ३ हे दोन्ही व्हिटॅमिन शरीरात कमी असतील तर व्यक्तीला कमजोरी येते. चला जाणून घेऊ व्हिटॅमिन डी कमी असल्यावर दिसणाऱ्या लक्षणांबाबत....
हाडे आणि मांसपेशी
जर तुमच्या हाडांमध्ये वेदना आणि कमजोरी सोबतच मांसपेशींमध्ये सतत वेदना होत असतील तर यांचं कारण व्हिटॅमिन डीची कमतरता असू शकतं. व्हिटॅमिन डी हाडांसाठी अत्यावश्यक असण्यासोबतच दातांसाठी आणि मांसपेशींसाठीही महत्त्वाचं पोषक तत्व आहे.
मूड स्विंग आणि स्ट्रेस
शरीरात व्हिटॅमिन डी ती कमतरतेचा थेट प्रभाव तुमच्या मूडवर पडतो. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे शरीरात सेरोटोनिन हार्मोनच्या निर्मितीवर प्रभाव पडतो. याच कारणाने तुमच्या मूडमध्ये सतत बदल होतो.
थकवा आणि आळस
जर तुम्हाला तुमच्यात ऊर्जेची कमतरता जाणवत असेल, तसेच थकवा आणि आळस जाणवत असेल तर तुमच्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकते. अशात वेळीच याची तपासणी करावी.
ब्लड प्रेशरची समस्या
जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर याचा प्रभाव तुमच्या ब्लड प्रेशरवर पडू शकतो. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे नेहमी ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होऊ शकते.
स्मरणशक्ती आणि भ्रम
खासकरुन महिलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास त्यांना तणावाचा अधिक सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना निराशा येते. महिलांना व्हिटॅमिन डीची अधिक गरज असते.