चहा जास्त उकडल्याने होऊ शकते ही गंभीर समस्या, हिवाळ्यात जास्त सेवन करणं टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 09:12 AM2024-01-09T09:12:41+5:302024-01-09T09:13:37+5:30

जर तुम्हाला सांगितलं की, थंडीच्या दिवसात जास्त चहा पिणं टाळलं पाहिजे तर तुम्ही असं कराल का?

What will happen if you drink too much tea in winters here are the side effects | चहा जास्त उकडल्याने होऊ शकते ही गंभीर समस्या, हिवाळ्यात जास्त सेवन करणं टाळा!

चहा जास्त उकडल्याने होऊ शकते ही गंभीर समस्या, हिवाळ्यात जास्त सेवन करणं टाळा!

चहा सगळ्यांनाच आवडतो. क्वचितच असं कुणी असतं जे चहा घेत नाहीत. खासकरून थंडीच्या दिवसात लोक चहाचं जास्त सेवन करतात. चहाशिवाय त्यांच्या दिवसाची सुरूवातच होऊ शकत नाही. असं म्हणतात की, थंडीच्या दिवसात एक कप चहाने तुमच्या अनेक समस्या दूर होतात. चहाला थंडीच्या दिवसात बेस्ट इम्यूनिटी बूस्टर मानलं जातं. पण जर तुम्हाला सांगितलं की, थंडीच्या दिवसात जास्त चहा पिणं टाळलं पाहिजे तर तुम्ही असं कराल का?

इंस्‍टाग्राम अकांउट डॉ. गुड‍डीडवर सीनिअर गेस्‍ट्रोएंटरोलॉलिस्‍ट अॅन्ड हेपेटोलॉजिस्ट व ओबेसिटी स्‍पेशलिस्‍ट डॉ. निवेदिता पांडे यांनी हिवाळ्यात चहाचं जास्त सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितलं की, हिवाळ्यात चहाचं सेवन खूप जास्त होतं. भलेही याचे काही फायदे होत असतील, पण याचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. चला जाणून घेऊ हिवाळ्यात चहाचं सेवन कमी का करावं.

जास्त उकडू नका

थंडीच्या दिवसात आल्याचा चहा मिळाला तर मन शांत होतं. हा चहा घेतल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. तसेच हिवाळ्यात पुन्हा पुन्हा लघवीला जाण्याची समस्याही दूर होते. पण, डॉ. पांडे यांनी आल्याचा चहा न पिण्याचा सल्ला दिला आहे. त्या सांगतात की, आपण चहामध्ये आलं, लवंग, वेलची टाकून बराच वेळ उकडतो. प्रयत्न करा की, चहा जास्त वेळ उकडू नका. कारण यामुळे चहामधील टॅनिन बाहेर येतं. जे अॅसिडिटीचं मोठं कारण बनतं.

काय असतं टॅनिन?

टॅनिन एकप्रकारचं अॅंटी-ऑक्सिडेंट आहे. जे चहा पावडरमध्ये आढळतं. जेव्हा टॅनिन जास्त प्रमाणात घेतलं जातं तेव्हा अॅसिड रिफ्लक्स आणि गॅस तयार होतो. जर चहा घेतल्यावर गॅस जास्त वेळापर्यंत बनत असेल तर पोटात सूज येऊ शकते. त्यामुळे ज्यांना आतड्यासंबंधी समस्या आहे त्यांनी चहाचं सेवन कमी करावं. इतकंच नाही तर जर पोटात इन्फेक्शन असेल तर चहाचं सेवन पूर्णपणे बंद करावं.

दिवसातून किती चहा प्यावा

एक्सपर्टनुसार, दिवसातून दोन किंवा तीनपेक्षा जास्त वेळा चहा घेऊ नये. हिवाळ्यात चहाचं सेवन दोन ते तीन वेळा करणंच चांगलं ठरू शकतं. यात तुम्ही हवं ते मिक्स करून पिऊ शकता. यापेक्षा जास्त वेळा चहा पिणं नुकसानकारक ठरू शकतं.

Web Title: What will happen if you drink too much tea in winters here are the side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.