रात्री कापलेल्या लिंबावर मीठ लावून बेडजवळ ठेवल्याने काय होतं? फायदे वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 12:52 PM2024-08-03T12:52:13+5:302024-08-03T12:52:56+5:30
Lemon Under Bed Benefits : आज आम्ही तुम्हाला लिंबाचे काही वेगळे फायदे सांगणार आहोत. जे तुम्हाला माहीत नसतील.
Lemon Under Bed Benefits : लिंबाचा वापर वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. सोबतच याचे आरोग्याला आणि सौंदर्य खुलवण्यातही अनेक फायदे होतात. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी किंवा एनर्जी मिळवण्यासाठी लिंबू पाण्याचं सेवनही करतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला लिंबाचे काही वेगळे फायदे सांगणार आहोत. जे तुम्हाला माहीत नसतील.
लिंबातील पोषक तत्व
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, कॅल्शिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. जे शरीरातील वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
कसा कराल वापर?
लिंबाचा एक तुकडा बेडजवळ ठेवल्याने शरीर आणि मनाला कितीतरी फायदे होतात. यासाठी तुम्हाला इतकंच करायचं आहे की, लिंबाचा एक तुकडा कापून घ्या आणि त्यावर थोडं मिठ टाका. हा लिंबाचा तुकडा बेडच्या जवळ ठेवा. हे ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं, पण तज्ज्ञांनी दावा केला आहे की, असं केल्याने फारच चांगले फायदे होतात.
नाक मोकळं होईल
अनेकांना लिंबाचा सुगंध फार आवडतो. याचा सुगंध केवळ रेफ्रिशिंग नाही तर अॅटीं-बॅक्टेरिअलही असतो. जर सर्दीमुळे तुमचं नाक बंद झालं असेल तर रात्री झोपताना बेडच्या बाजूला उशाजवळ कापलेलं लिंबू ठेवा. याने तुम्हाला चांगली झोपही येईल आणि नाकही मोकळं होईल.
तणाव होईल दूर
लिंबाच्या सुगंधाला डी-स्ट्रेसिंग मानलं जातं. कारण या सुगंधाने तणाव कमी होतो आणि आपल्या इंद्रियांना आराम मिळतो. जर तुम्हाला फार थकवा जाणवत असेल किंवा तुम्ही तणावात असाल एक लिंबाचा तुकडा तुमची ही समस्या दूर करू शकतो.
वेगवेगळ्या रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, लिंबाचा सुगंध शरीरात सेरोटोनिन हार्मोनचं प्रमाण वाढवतं. हे सेरोटोनिन हार्मोन चांगल्या झोपेसाठी फायद्याचे असतात. त्यामुळे चांगल्या झोपेसाठी लिंबाचा असा वापर तुम्ही करूच शकता.
माश्या आणि डास पळवा
माश्या आणि डासांना लिंबाचा सुगंध पसंत नसतो. त्यामुळे माश्या आणि डासांनी हैराण झाले असाल किंवा झोपेचं खोबरं होत असेल तर झोपताना जवळ एक कापलेलं लिंबू ठेवा. त्यावर दोन तीन लवंग टोचून लावा. याने तुमच्याजवळ ना माश्या येतील ना डास येतील. कारण लिंबाचा आणि लवंगाचा वास माश्या आणि डासांना आवडत नाही.
इन्सोमेनिया
झोप न येणं ही वेगवेगळ्या गंभीर समस्यांची सुरूवात असू शकते. जर तुम्हाला झोप न येण्याची म्हणजे इनसोमेनियाची समस्या असेल तर हा फंडा तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. याने तुम्हाला चांगली झोप येऊ शकते.
घरातील हवेची गुणवत्ता सुधारेल
काही समस्या असली म्हणजेच लिंबाचा असा वापर करावा असं काही नाही. रूममधील हवेची गुणवत्ता चांगली नसेल तर तुम्ही लिंबाच्या तुकड्याचा वापर करू शकता. लिंबाच्या एका तुकड्याने रूममधील हवा फ्रेश होऊ शकते. याने रूममधील हवेची गुणवत्ता सुधारू शकते.