एक महिना मीठ खाणं सोडलं तर काय होईल? जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 12:08 PM2024-09-23T12:08:29+5:302024-09-23T12:33:15+5:30

Quit Salt For A Month Challenge: एका रिपोर्टनुसार, एका निरोगी व्यक्तीने एका दिवसात ४ ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचं सेवन करू नये. अशात मीठ खाणंच बंद केलं तर काय होईल. हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

What will happen if you quit salt for a month 30 days | एक महिना मीठ खाणं सोडलं तर काय होईल? जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतं!

एक महिना मीठ खाणं सोडलं तर काय होईल? जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतं!

Quit Salt For A Month Challenge : मीठ आपल्या रोजच्या आहारातील महत्वाचा भाग आहे. मिठाशिवाय अनेक पदार्थांना अजिबात चव लागत नाही. पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की, जर एक महिना मीठ खाणं सोडलं तर शरीरावर काय प्रभाव पडेल? मीठ खाणं सोडणं कधीकधी कॉमन असतं. याने तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रभाव पडतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायझेशनच्या एका रिपोर्टनुसार, एका निरोगी व्यक्तीने एका दिवसात ४ ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचं सेवन करू नये. अशात मीठ खाणंच बंद केलं तर काय होईल. हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

एक महिना मीठ खाणं सोडलं तर...?

1) वजन होईल कमी

मीठ खाणं सोडल्यावर सगळ्यात आधी तुमचं वजन कमी होईल. जेव्हा तुम्ही एक महिना मीठ खाणं सोडता, तेव्हा तुमच्या शरीराला कमी खाण्याची सवय लागते. ज्यामुळे पोट आणि कंबरेवरील चरबी कमी होते. पण तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की, जर वजन फार जास्त कमी होत असेल तर आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

२) डायजेशनमध्ये समस्या

एक महिन्यासाठी मीठ खाणं सोडल्यावर शरीरातील वेगवेगळ्या क्रियांवर प्रभाव पडतो. याने तुमच्या पचन तंत्रामध्ये समस्या होऊ शकते आणि तसेच तुमच्या आतड्याही प्रभावित होऊ शकतात. ज्यामुळे पोटदुखी आणि आजारांचा धोका होऊ शकतो.

३) मेंटल हेल्थ प्रॉब्लेम

मानसिक आरोग्याच्या दृष्टीने बघितलं तर मीठ पूर्णपणे खाणं सोडणं तुमच्या मानसिक आरोग्याचं नुकसान करू शकतं आणि तुम्हाला तणाव, चिंता आणि उदासीनता जाणवू शकते. याचा अर्थ असा काही कमी प्रमाणात मिठाचं सेवन गरजेचं आहे.

काय घ्याल काळजी?

आता तुमच्या लक्षात आलं असेल की, एक महिना मिठाचं सेवन बंद करणं नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे असं करण्याआधी तुम्ही विचार करायला हवा. त्याशिवाय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मिठामध्ये सोडिअम असतं जे आपल्या शरीरासाठी कमी प्रमाणात का असेना गरजेचं असतं. हे कमी झालं तर शरीरात वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.

Web Title: What will happen if you quit salt for a month 30 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.