जर तुम्ही ३० दिवस साखर खाणे बंद केले तर काय होईल? जाणून घ्या याचे परिणाम चांगले की वाईट?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 05:29 PM2021-10-08T17:29:22+5:302021-10-08T17:32:42+5:30

जर एखादी व्यक्ती ३० दिवस मिठाई किंवा काहीच गोड खात नसेल तर? तर ते त्या व्यक्तीसाठी चांगले की, वाईट? याचा त्यांच्यावरती काय परिणाम होईल? अशा प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.

what will happen if you stop eating sugar for 30 days know the truth | जर तुम्ही ३० दिवस साखर खाणे बंद केले तर काय होईल? जाणून घ्या याचे परिणाम चांगले की वाईट?

जर तुम्ही ३० दिवस साखर खाणे बंद केले तर काय होईल? जाणून घ्या याचे परिणाम चांगले की वाईट?

googlenewsNext

जर तुम्हाला डायबिटीस असेल किंवा तुम्ही डायबिटीस पेशंट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असाल तर या दोन्ही बाबतीत तुम्हाला मिठाई न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण गोड अन्न पूर्णपणे सोडून द्यावे का? जर एखादी व्यक्ती ३० दिवस मिठाई किंवा काहीच गोड खात नसेल तर? तर ते त्या व्यक्तीसाठी चांगले की, वाईट? याचा त्यांच्यावरती काय परिणाम होईल? अशा प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.

एका सर्वेक्षणातून खुलासा
२०१९ मध्ये अमेरिकेत एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यादरम्यान असे आढळून आले की, एक व्यक्ती दरवर्षी सरासरी २८ किलो साखर वापरते. इतकी साखर शरीरासाठी घातक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, एका व्यक्तीने एका दिवसात ६-७ चमचे साखर खाल्ली पाहिजे.

जर तुम्ही ते ग्रॅममध्ये पाहिले तर त्याचा सरळ अर्थ असा आहे की, एका दिवसात फक्त २५-३० ग्रॅम साखर खावी, जर तुम्ही यापेक्षा जास्त खाल्ले तर तुम्हाला त्याचा अपाय होईल. त्याचवेळी अमेरिकन हार्ट असोसिएशनचे असे म्हणणे आहे की, महिलांनी पुरुषांपेक्षा कमी साखर खावी. यांच्या म्हणण्यानुसार, पुरुषांनी एका दिवसात १५०कॅलरीज साखरेचा वापर करावा तर महिलांनी फक्त १०० कॅलरीज साखरेचा वापर करावा.


आपण ३० दिवस गोड न खाल्ल्यास काय होईल?
अनेक पदार्थांमधून गोड आपल्या पोटात जातं. जवळजवळ प्रत्येक गोड पदार्थांमध्ये साखर वापरली जाते.  साखर गोड असते, आणि ती आरोग्यासाठी विषापेक्षा कमी नाही. गोड काही काळ तुमच्यासाठी चांगले असू शकते परंतु नंतर ते तुम्हाला अनेक आजार देऊ शकते. अशा परिस्थितीत जर ३० दिवस जर एखाद्या व्यक्तीने साखरं खाणं सोडून दिलं तर त्याच्या शरीरासाठी ते फायद्याचं ठरु शकतं आणि ती व्यक्ती एनर्जेटीक फील करते. तसेच यामुळे चिडचिडेपणा कमी होतो आणि यामुळे थकावट देखील होते.

गोड सोडण्याचा योग्य मार्ग कोणता?
जर तुम्ही अचानक साखर खाणे बंद केले तर तुम्हाला अशक्तपणा जाणवू लागेल. हे टाळण्यासाठी साखरेचे प्रमाण हळूहळू कमी करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या सकाळच्या चहामध्ये २ चमचे साखर घेत असाल, तर आधी ते एक आणि नंतर अर्धा चमचा इतके प्रमाण करा आणि नंतर हळू हळू सोडा.

परंतु आपण फळे, धान्ये इत्यादी गोड गोष्टी खाणे चालू ठेवले पाहिजे. जर तुम्ही गोड पदार्थ खाणे पूर्णपणे बंद केले तर ते तुमच्या शरीरासाठी ते घातक ठरू शकते. गोड पदार्थ खाणे पूर्णपणे सोडून दिल्यानंतर, तुमचे शरीर चरबीपासून ग्लुकोज बनवण्यासाठी केटोन्स तयार करण्यास सुरुवात करते आणि हे केटोन्स शरीरात साठवलेल्या चरबीचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करतात, ज्यामुळे तुमची चरबी वितळण्यास सुरुवात होते. या प्रक्रियेला केटोसिस म्हणतात.

Web Title: what will happen if you stop eating sugar for 30 days know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.