'या' कारणांमुळेही वाढतो टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 10:14 AM2019-06-10T10:14:04+5:302019-06-10T10:21:17+5:30
जर तुम्हाला असं वाटत असेल की, केवळ जास्त गोड खाल्ल्याने डायबिटीस होतो किंवा साखरेचं सेवन कमी प्रमाणात केल्याने तुम्हाला डायबिटीसचा धोका कमी असतो तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात.
जर तुम्हाला असं वाटत असेल की, केवळ जास्त गोड खाल्ल्याने डायबिटीस होतो किंवा साखरेचं सेवन कमी प्रमाणात केल्याने तुम्हाला डायबिटीसचा धोका कमी असतो तर तुम्ही चुकीचे आहात. लाइफस्टाईल कशी आहे, तुम्ही काय खाता आणि कसे खाता या तीन मुद्द्यांवर अवलंबून असतं की, तुम्हाला टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका किती आहे. सोबतच तुमचा डायबिटीस बरा झाला असेल तर तुम्हाला अधिक जास्त सतर्क राहण्याची गरज आहे.
२ हजार लोकांवर करण्यात आला रिसर्च
अमेरिकेच्या मेरीलॅंड येथील बाल्टीमोरमध्ये झालेल्या न्यूट्रीशन २०१९ च्या मीटिंगमध्ये एका रिसर्चचे निष्कर्ष समोर ठेवले गेले. त्यात सांगण्यात आलं आहे की, एखादी व्यक्ती काय खाते आणि कशाप्रकारे खाते याचा प्रभाव टाइप २ डायबिटीस होण्याच्या शक्यतेवर पडतो. या रिसर्चमध्ये अमेरिकेतील २ हजार ७१२ तरूण-वयस्क लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. आणि त्यांच्या डाएटवर मोठ्या काळासाठी लक्ष ठेवण्यात आलं. तसेच वेळोवेळी फॉलोअपही घेण्यात आला.
या गोष्टींमुळे डायबिटीसचा धोका कमी
ज्या लोकांनी साधारण २० वर्षांपर्यंत फळं, भाज्या, धान्य, नट्स, ड्रायफ्रूट्स आणि व्हेजिटेबल आइल यांचा त्यांच्या आहारात समावेश केला, त्यांना टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका ६० टक्के कमी झाला. रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, जर जास्त काळासाठी प्लांट बेस्ड डाएटचं जास्त सेवन केलं गेलं तर डायबिटीस होण्याचा धोका कमी केला जाऊ शकतो.
कसा टाळाल डायबिटीसचा धोका?
(Image Credit : FirstCry Parenting)
जे लोक त्यांच्या डाएटमध्ये पदार्थांमधून किंवा सप्लिमेंट्सच्या माध्यमातून व्हिटॅमिन बी२ आणि व्हिटॅमिन बी६ चं जास्त प्रमाणात सेवन करतात, त्यांना टाइप २ डायबिटीस होण्याचा धोका कमी असतो. एका वेगळ्या रिसर्चमध्ये २ लाख लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यातून समोर आलं की, वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून व्हिटॅमिन बी१२ चं अधिक प्रमाणात सेवन केलं तर टाइप २ डायबिटीसचा धोका वाढतो. याचा अर्थ असा होतो की, अॅनिमल बेस्ड प्रॉडक्टचं जास्त सेवन केल्यास डायबिटीसचा धोका वाढतो.
कसं खाता याचा ब्लड शुगर लेव्हलशी संबंध
(Image Credit : Healthline)
एका दुसऱ्या रिसर्चनुसार, तुम्ही कशाप्रकारे जेवण करता किंवा काय जेवण करता याचा तुमच्या ब्लड शुगर लेव्हलशी खोलवर संबंध असतो. अभ्यासकांना असं आढळलं की, आधी भात खाणे आणि नंतर भाजी किंवा मांस खाणे यामुळे ब्लड शुगरचं प्रमाण वाढतं. जर आधी भाजी किंवा मांस खाल्लं गेलं आणि नंतर भात खाल्ला तर ब्लड शुगर लेव्हल वाढण्यापासून रोखलं जाऊ शकतं.