शरीरात रक्त वाढवण्यासाठी सकाळी काय खावं? डायटिशिअनने दिला खास सल्ला....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 10:19 AM2024-08-10T10:19:52+5:302024-08-10T10:20:26+5:30
जर रिकाम्या पोटी केवळ चहा किंवा कॉफी पित असाल किंवा मसालेदार नाश्ता करत असाल तर याने पोट खराब होण्याचा धोका अधिक असतो.
Healthy Foods : सकाळी आपण जे खातो त्याचा आपल्या आरोग्यावर जास्त प्रभाव पडतो. जर सकाळी योग्य पदार्थांचं सेवन केलं तर दिवसभर शरीराला चांगली ऊर्जा मिळू शकते. जर रिकाम्या पोटी केवळ चहा किंवा कॉफी पित असाल किंवा मसालेदार नाश्ता करत असाल तर याने पोट खराब होण्याचा धोका अधिक असतो.
न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी दिवसाची सुरूवात काय खाऊन केली पाहिजे याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात सांगितलं की, काही बीया किंवा ड्राय फ्रूट्सचं सेवन करून ब्लोटिंग, गॅस, केसगळती आणि आयर्न कमी असण्याची समस्या दूर केली जाऊ शकते.
सकाळी काय खावं?
- डायटिशिअननुसार, जर तुमच्या शरीरात आयर्न कमी असेल तर तुम्ही सकाळी २ भिजवलेले खजूर खाऊ शकता. खजूरामध्ये आयर्न भरपूर असतं.
- गॅस आणि ब्लोटिंगची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही अर्धा चमचा ओवा भाजून खाऊ शकता. ओव्यामध्ये अॅक्टिव तत्व असतात जे पोटातील अॅसिड चांगलं करण्यासोबतच अपचन, ब्लोटिंग आणि गॅसची समस्या दूर करण्यास मदत करतात.
- त्वचेवर आलेली पुरळ दूर करण्यासाठी एक सोपा उपाय आहे. जर तुम्हाला नेहमीच चेहऱ्यावर पुरळ येत असेल आणि चेहऱ्यावर डाग असतील तर अर्धा चमचा भिजवलेल्या सब्ज्याचं सेवन करा. अर्धा चमचा सब्जा १० ते १५ मिनिटे एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि या पाण्याचं सेवन करा. रोज हे पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर पुरळ आणि डाग दूर होतील.
वजन कमी करणारा चहा
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर सकाळी एक खास चहाचं सेवन करू शकता. हा चहा बनवण्यासाठी एक चमचा चहा पावडर, अर्धी दालचीनीची काडी, अर्ध्या लिंबाचा रस, एक चमचा मध आणि ४ ते ५ पदीन्याची पाने हवेत. आधी एक कप पाणी उकडून घ्या आणि त्यात चहा पावडर आणि दालचीनीचा तुकडा टाका. ५ मिनिटांनी हे पाणी एका कपमध्ये काढा. त्यात लिंबाचा रस, मध आणि पदीन्याची पाने टाका. या चहामध्ये कॅलरी काहीच नसतात. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.