कसे असतात वेगाने चालणारे लोक? चालण्यातून अनेक गोष्टींचा होतो खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 04:19 PM2023-03-06T16:19:59+5:302023-03-06T16:20:48+5:30
Walking Personality Types:यावरून तुम्ही व्यक्तीबाबत सगळं काही जाणून घेऊ शकता. चला जाणून घेऊ लोकांच्या चालण्याच्या पद्धतीवरून त्यांच्या स्वभावाबाबत काय समजतं.
Walking Personality Types : अनेक लोक रोज चालतात. काही हळू चालतात तर काही वेगाने चालतात. प्रत्येक व्यक्तीची चालण्याची एक पद्धत असते. पण तुम्हाला वाटेल की, यात काय नवीन आहे? पण असं नाहीये. यावरून तुम्ही व्यक्तीबाबत सगळं काही जाणून घेऊ शकता. चला जाणून घेऊ लोकांच्या चालण्याच्या पद्धतीवरून त्यांच्या स्वभावाबाबत काय समजतं.
जर वेगाने चालत असाल...
वेगाने चालणारे लोक मेहनती असतात. ते कर्तव्यनिष्ठ आणि एक्स्ट्रोवर्ट असतात. हे लोक रिस्क घेणारे मानले जातात. त्यांना टेंशन फ्री जीवन जगणं आवडतं. ते पुढाकार घेण्यातही इतरांपेक्षा पुढे असतात.
हळू चालणारे लोक
हळूवार चालणारे लोक इंट्रोवर्ट पद्धतीचे असतात. हळू चालणारे लोक सेल्फ सेंटर्ड असतात. हे लोक स्वत:सोबतच अधिक संतुष्ट असतात. एका रिसर्चनुसार, या लोकांना अॅक्टिव लाइफस्टाईल कमी पसंत असते.
लांब पावलं टाकणारे लोक
जे लोक लांब पावलं टाकून चालतात ते लोक फार पॉझिटिव्ह असतात. या लोकांचा स्वभाव उग्र आणि प्रतिस्पर्धी असतो. या द्वारेच लोक आपलं काम पूर्ण करतात. अशी चाल असणारे लोक जास्त प्रोडक्टिव, बुद्धिमान आणि तार्किक असतात. पण पर्सनल रिलेशनबाबत हे लोक थंड असतात. आजूबाजूचे लोक त्यांचं कौतुकही करतात.
पाय घासत चालणारे लोक
जे लोक पाय घासत चालतात ते लोक फार काळजी करणारे आणि चिंतेत राहतात. ते लोक उदास असतात. त्यांच्या ऊर्जा आणि उत्साह कमी असतो. हे लोक फार सुस्त असतात.
आरामात चालणारे लोक
असे लोक आपल्या शर्थींवर जगणं पसंत करतात. हे नेहमीच संतुष्ट आणि टेंशन फ्री लाइफ जगतात. हे लोक गर्दीतही शांत असतात. या लोकांच्या या चालण्याला सगळ्यात शानदार पद्धत मानली जाते. हे लोक रस्त्याने बिनधास्त मान वर करून चालतात.